Coronavirus : ‘कोरोना’ रूग्णांचा रिकव्हरी रेट 41 % तर ‘या’ 5 राज्यांतून आले 80 % नवे पॉझिटिव्ह : आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा भारतात प्रकोप सुरू आहे. भारतात कोरोना व्हायरसचे रूग्ण आणि त्यामुळे मरणार्‍यांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बंगाल आणि दिल्लीत सर्वात जास्त लोकांनी प्राण गमावले आहेत.

शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोना व्हायरसचे 80 टक्के मृत्यू हे पाच राज्यात म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बंगाल आणि दिल्लीत झाले आहेत, तर 60 टक्के मृत्यू केवळ पाच शहरात म्हणजे मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद आणि ठाणे येथे नोंदण्यात आले आहेत. अशाच प्रकारे 70 टक्के मृत्यू केवळ 10 शहरात म्हणजे मुंबई, अहमदाबाद, पुणे, दिल्ली, कोलकाता, इंदौर, ठाणे, जयपुर, चेन्नई आणि सूरतमध्ये झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने हे सुद्धा सांगितले की, कोरोना व्हायरसची 80 टक्के प्रकरणे पाच राज्यांत समोर आली आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि मध्य प्रदेशचा सहभाग आहे. तर, 90 टक्के प्रकरणे 10 राज्यात दिसून आली आहेत.

आरोग्य मंत्रालयानुसार कोरोना व्हायरसची 60 टक्के प्रकरणे केवळ पाच शहरात म्हणजे मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद आणि ठाण्यात समोर आली आहेत, तर 70 टक्के रूग्ण 10 शहरात आढळले आहेत. भारतात कोरोना व्हायरसचे रूग्ण वेगाने बरेसुद्धा होत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, आता देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांचा रिकव्हरी रेट 41 टक्के आहे. मागील 24 तासात 3334 कोरोना रूग्ण रिकव्हर झाले आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत 48 हजार 534 लोक रिकव्हर झाले आहेत.

ते म्हणाले, देशात कोरोनामुळे मरणार्‍यांची संख्या केवळ 3.02 टक्के आहे. 19 मे रोजी कोरोनाने मरण पावण्याचे प्रमाण 3.13 टक्के होते, जा आता 0.32 टक्क्यांनी कमी झाला आहे. तर, आतापर्यंत देशात एक लाख 18 हजार 446 पेक्षा जास्त लोक कोरोना व्हारसने बाधित झाले आहेत, ज्यामधील 3 हजार 583 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like