‘कोरोना’ व्हायरस तर काहीच नाही, ‘या’ महामारीमुळं गेले होते 10 कोटी लोकांचे बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात वाढत असलेला कोरोनाचा प्रभाव पाहता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस ला ‘जागतिक साथीचा आजार’ म्हणून घोषित केले आहे. सध्या दीड लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून, ५२४१ लोकांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनामुळे १९१८ मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लू रोगाची आठवण होते. या रोगात तब्बल १० कोटींपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या महायुद्धात बळी पडलेल्या नागरिकांच्या संख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे. स्पॅनिश फ्लू हा मानवी इतिहासातील सर्वात भीषण साथीचा आजार होता. या आजाराने डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजोबांचा बळी घेतला होता.

स्पॅनिश फ्लू बाबत असलेली तथ्ये –
जागतिक महायुद्धाच्या काळात ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्समध्ये स्पॅनिश फ्लू ने शिरकाव केला होता. त्यानंतर हा रोगाने स्पेनमध्ये प्रवेश केला पण माध्यमांनी ही बाब लपवून ठेवली. लॉरा स्पिननी यांनी ‘द गॉर्जियन’मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये याची माहिती दिली म्हणून स्पेनने प्रसारमाध्यांवर बंदी घातली. याच कारणामुळे या साथीच्या आजाराला स्पॅनिश फ्लू असे नाव पडले. ब्राझिलच्या लोकांनी या आजाराला जर्मन फ्लू असे नाव दिले. तर सेलेगलमध्ये या आजाराला ब्राझील फ्लू असे म्हंटले गेले.

‘कोरोना’ हे नाव कसे पडले ?
कोरोना या साथीच्या रोगामुळे लोकं चीनला दोषी मानत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने २०१५ मध्ये एखाद्या आजाराला नाव देण्याबाबतचे मार्गदर्शन केले आहे. याच कारणामुळे या साथीच्या आजाराला चीनी फ्लू किंवा मग वुहान फ्लू असे नाव दिलेले नाही. साथीच्या आजाराला कोविड-१९ असे नाव देण्यात आले आहे.

कोरोना व स्पॅनिश फ्लूची तुलना करणे योग्य आहे का ?
कोरोना व्हायरस आणि स्पॅनिश फ्लू हा दोन्ही रोगांचे विषाणू वेगवेगळे असल्यामुळे या दोन्ही रोगांची तुलना करणे योग्य आहे का ? असे प्रश्न लॉरा स्पिननी यांनी आपल्या लेखात विचारले आहेत. Sara-CoV-2 मुळे कोविड-१९ आलेला आहे. हा करोनाव्हायरसशी संबंधित आहे. हा सार्स आणि MERS शी संबंधित आहे.

‘या’मुळे स्पॅनिश फ्लूइतका धोकादायक ठरला नाही कोरोना
कोरोना व्हायरस ला रोखणे हे स्पॅनिश फ्लू पेक्षा तुलनेने सोप्पे आहे. स्पॅनिश फ्लू हा अतिशय जलद गतीने पसरतो तर कोरोना हा समूहाद्वारे पसरतो. सन १९१८ पासून आतापर्यंत जगभरात अनेक मोठे बदल झाले आहेत.

You might also like