‘कोरोना’वर प्रभावी ठरत असेल्या Pfizer Vaccine ची भारतात किती किमत असेल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात अद्यापही कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव सुरु आहे. कोरोनावरील लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट येणार अशी देखील चर्चा सुरु आहे. अशातच अमेरिकेतील फायझर आणि बायोनटेकच्या (Pfizer Vaccine) कंपनीने दावा केला आहे की त्यांनी विकसित केलेली कोरोनावरील लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी ( pfizer-vaccine-which-successful-against-coronavirus) आहे. त्यामुळे लसीबाबत आरोग्य जगताला खूप अपेक्षा आहेत. आता या लसीच्या किमतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. फायझरच्या या लसीची किंमत खूप जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लस सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याचे दिसत आहे.

फायझर आणि बायोनटेकच्या लसीच्या यशस्वीतेबाबत खूप अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते फायझरची लस ही कोरोनाविषाणूविरोधात यश मिळवणारी पहिली लस ठरेल. फायझरने आपल्या या लसीची किंमत ही 39 डॉलर ( प्रत्येक डोसासाठी 19.5 रुपये) एवढी ठेवली आहे. तर लसीवर काम करत असलेल्या मॉडर्नाने लसीची किंमत ही 37 डॉलर एवढी ठेवली आहे. आता या लसीची भारतातील किंमत किती असेल याची माहिती घेण्यात येत आहे. युरोपिय महासंघ, जपान, अमेरिका आणि ब्रिटन यांनी फायझरसोबत कोरोनावरील लसीसाठी करार केला आहे. या करारांतर्गत त्यांना 2021 पर्यंत 1.3 बिलीयन लसी मिळण्याची शक्यता आहे. तर भारतीय लस निर्मात्या कंपन्या आणि सरकारने फायझरसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही.

तसेच डब्ल्यूएचओची लस विकसित करत असलेल्या फायझरच्या सोबतही कुठलाही करार केला नाही. खरेदीपेक्षा फायझरच्या अल्ट्रा कोल्ड व्हॅक्सिनसाठी सर्वात मोठे आव्हान साठवण असेल. फायझरच्या लसीला उणे 70 ते उणे 80 डिग्री तापमानामध्ये वाहतूक करून नेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण फ्रीजमध्ये ही लस 24 ते 48 तासात खराब होऊ शकते. फायझरची लस ही भारतातील उष्ण वातावरणात फारशी उपयुक्त असेल असे वाटत नाही. अशा परिस्थितीत विकसित देशांना अल्ट्रा कोल्ड चेनच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक असेल. सध्या भारताकडे सुमारे 27 हजार कोल्ड चेन पॉईंट्स आहेत. हे 2 ते 8 डिग्रीपर्यंत प्रशितन पुरवतात. काही कोल्ड चेन इफ्रास्ट्रक्चर विशिष्ट औषधांसाठी उणे 30 डिग्रीपर्यंत काम करतात. एकूण कोल्ड चेन इफ्रापैकी 90 टक्के कृषीमाल साठवण आणि केवळ 10 टक्के औषधांच्या आवश्यकतेसाठी वापरले जातात.