PM नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला करणार संबोधित, ‘कोरोनो’ व्हायरसबाबत बोलणार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे देशात निर्माण होत असलेली स्थिती आणि तिच्याशी दोन हात करण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न, याबाबत आज गुरूवार 19 मार्चरोजी रात्री देशाला संबोधित करणार आहेत. ही माहिती पंतप्रधान कार्यालयाने बुधवारी दिली. पीएमओने ट्विट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मार्च 2020 ला रात्री आठ वाजता देशाला देशाला संबोधित करतील, ज्यामध्ये कोरोना व्हायरसचे मुद्दे आणि त्यासाठी सुरू असलेले प्रयत्न याबाबत ते बोलतील. एका अन्य ट्विटमध्ये पीएमओने म्हटले, कोरोना व्हायरसबाबत मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक सुद्धा घेतली.

भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांची संख्या 151 झाली आहे. आतापर्यंत 16 राज्य दिल्ली, हरियाणा, केरळ, राजस्थान, तेलंगाना, उत्तर प्रदेश, लडाख, तमिळनाडु, जम्मू-कश्मीर, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसच्या पॉझिटीव्ह केस समोर आल्या आहेत.

तर चीनमूधन बाहेर पडलेला कोरोना व्हायरस युरोपमध्ये सुद्धा भीषण विध्वंस करत आहे. चीनमध्ये कोविड-19 च्या प्रकोपाने मरणार्‍यांची संख्या वाढून 3,237 झाली आहे. तर आशियाई देशात संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 80,894 झाली आहे.