पुणे पोलिसांचा वाहतूकीसंदर्भात आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय, 31 मार्चपर्यंत शहरातील वाहतूक पुर्णपणे बंद !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सर्वत्र होत असतानाच आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी वाहतूकीसंदर्भात एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. आज (सोमवार) संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतरपासुन 31 मार्चपर्यंत शहरात वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे.


कोरानाग्रस्तांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यास आळा घालण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, पुणे शहरातील वाहतूक पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. यापुर्वी पुणे शहरात अशा प्रकारे वाहतूक कधीही बंद झालेली नव्हती. दरम्यान, दुचाकी आणि चारचाकी वाहनांना देखील बंदी घालण्यात आली आहे.

आदेशातून सूट असणारी वाहतूक व्यवस्था

1. पोलीस, आरोग्य विभाग आणि आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी संबंधित कर्मचारी व अधिकारी

2. तातडीचे रुग्णवाहतुक व रुग्णालयामधील डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी

3. अत्यावश्यक, उदा. वीज, पाणी पुरवठा, अग्निशमन, बँका, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वच्या पायाभूत विकासांबधित व्यवसाय

4. जीवनावश्यक सेवा, वस्तू, व माल यांची वाहतूक

5. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी

6. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडून देण्यात पास आलेल्या व्यक्ती


पुण्यातील रस्त्यांवर, सार्वजनिक वाहतुकीने रस्त्यावर, गल्ली-बोळात याठिकाणी सायकल तसेच पारंपारिक व अपारंपारिक इंधनावर चालणाऱ्या मोटार सायकली व तीन चाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने जड वाहतुकीचे वाहने यांचा प्रवास व वाहतूक करण्यास बंदी केली आहे.