Coronavirus : ‘कोरोना’मुळं पुण्यात 12 दिवसात 26 जणांचा बळी, 15 पुरूष अन् 11 महिलांचा समावेश, सरासरी वय 58.61

पुणे : अमोल वारणकर – कोरोना व्हायरसनं संपुर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनामुळं देशात आतापर्यंत 200 जणांचा बळी गेला आहे तर कोरोनाबाधितांची संख्या 6761 वर जाऊन पोहचली आहे. पुण्यात कोरोनाचे पहिले दोन रूग्ण 9 मार्च रोजी आढळले होते. ते दोघही दुबईहून पुण्यात आले आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर संपुर्ण शहरात चिंतेचं वातावरण पसरलं. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना कोरोनामुळं 30 मार्च रोजी पुण्यात पहिला बळी गेला 52 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आणि पुणेकरांची चिंता आणखीनच वाढली. 10 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार पुण्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधितांची संख्या 200 पार झाली आहे. 8 एप्रिलला एकाच दिवशी पुण्यात 10 जणांचा कोरोनामुळं बळी गेला होता.

पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झालेल्या 26 जणांमध्ये 15 पुरूषांचा तर 11 महिलांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या पुरूषांचं सरासरी वय हे 56.66 आहे तर महिलांचं सरासरी वय हे 61. 27 आहे. मृत्यू झालेल्या 26 जणांवरून सरासरी काढल्यास मृत्यू होणार्‍याचं सरासरी वय हे 58.61 आहे. मृत्यू झालेल्या पुरूषांमध्ये सर्वाधिक वय असलेल्या 73 वर्षीय वृध्दाचा समावेश होता तर पुण्यातील सर्वात कमी म्हणजेच 40 वयाच्या एका पुरूषाचा देखील मृत्यू झाला आहे. मुळचा अहमदनगरचा असलेला एक रूग्ण उपचारासाठी पुण्यात दाखल झाला होता. त्यांच वय केवळ 30 होतं. त्याचा देखील 10 एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्या महिलांमध्ये सर्वाधिक वय 67 तर सर्वात कमी वय हे 50 होतं. मृत्यू झालेल्या बहुतांश जणांना इतर आजार देखील मोठया प्रमाणावर होते. पुण्यातील ससून आणि नायडू रूग्णालयासह इतर काही खासगी रूग्णालयात देखील कोरोनाच्या रूग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनातील सर्वच वरिष्ठ अधिकारी कोरोनाचा सामना करण्यासाठी दिवस-रात्र एक करताना दिसत आहेत. त्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तालय, आरोग्य विभाग आणि सर्वात महत्वाचा म्हजणे पोलिस आयुक्त कार्यालयाचा समावेश आहे.

पुण्यात मृत्यू झालेल्यांपैकी 24 जण हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील आहेत तर एक जण बारामती येथील तर दुसरा अहमदनगर जिल्हयातील होता. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 200 च्या पार झाली असून बहुतांश रूग्ण ज्या परिसरात आढळून आले आहेत ते परिसर पोलिसांनी सील केले आहेत. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे.

पुण्यात मृत्यू झालेल्या 26 जणांची माहिती – तारीख, वय आणि लिंग पुढील प्रमाणे

1. 30 मार्च रोजी 52 वर्षीय पुरूष
2. 2 एप्रिल रोजी 50 वर्षीय महिला
3. 4 एप्रिल रोजी 60 वर्षीय महिला
4. 4 एप्रिल रोजी 52 वर्षीय पुरूष
5. 5 एप्रिल रोजी 69 वर्षीय महिला
6. 6 एप्रिल रोजी 67 वर्षीय महिला
7. 6 एप्रिल रोजी 65 वर्षीय पुरूष
8. 7 एप्रिल रोजी 67 वर्षीय पुरूष
9. 7 एप्रिल रोजी 65 वर्षीय पुरूष
10. 7 एप्रिल रोजी 67 वर्षीय पुरूष
11. 7 एप्रिल रोजी 55 वर्षीय महिला
12. 8 एप्रिल रोजी 48 वर्षीय पुरूष
13. 8 एप्रिल रोजी 54 वर्षीय पुरूष
14. 8 एप्रिल रोजी 73 वर्षीय पुरूष
15. 8 एप्रिल रोजी 71 वर्षीय पुरूष
16. 8 एप्रिल रेाजी 57 वर्षीय महिला
17. 8 एप्रिल रोजी 62 वर्षीय पुरूष
18. 8 एप्रिल रोजी 40 वर्षीय पुरूष
19. 8 एप्रिल रोजी 60 वर्षीय पुरूष
20. 8 एप्रिल रोजी 63 वर्षीय महिला
21. 9 एप्रिल रोजी 65 वर्षीय महिला
22. 9 एप्रिल रेाजी 58 वर्षीय महिला
23. 9 एप्रिल रोजी 65 वर्षीय महिला
24. 9 एप्रिल रोजी 65 वर्षीय महिला
25. 9 एप्रिल रोजी 44 वर्षीय पुरूष
26. 10 एप्रिल रोजी 30 वर्षीय पुरूष

ससून रूग्णालय – 17
जिल्हा रूग्णालय – 01
डीएमएच – 01
नोबल हॉस्पीटल -02
जहाँगीर हॉस्पीटल – 01
सह्याद्री हॉस्पीटल – 01
नायडू हॉस्पीटल – 01
इनामदार हॉस्पीटल – 01