Coronavirus : ‘कोरोना’चे नियम मोडल्यावर ‘या’ मुस्लिम देशात 42 लाखाचा दंड अन् 3 वर्षाच्या जेलची शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रविवारी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालण्याबद्दल कतारने कडक शिक्षा ठोठावली आहे. एएफपीच्या अहवालानुसार यापुढे कतारमध्ये मास्क न घातल्यावर जगातील सर्वात कठोर शिक्षा मिळेल आणि लोकांना तीन वर्षापर्यंत तुरुंगात पाठविले जाऊ शकते. यासह दंडाची एक मोठी रक्कम देखील द्यावी लागू शकते. दरम्यान, कतारमध्ये कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होत असून तेथे संसर्गाचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. दरम्यान, नियम मोडणाऱ्यांना कडक शिक्षा जाहीर करण्याची प्रशासनाने घोषणा केली आहे.

कतारची लोकसंख्या सुमारे 27 लाख आहे. तर येथे 30 हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झालेला आहे. कोरोनामुळे येथे आतापर्यंत सुमारे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथे मास्क न घालण्याचे नियम मोडणाऱ्यांना 41.7 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. दरम्यान, जे लोक त्यांच्या कारमध्ये एकट्याने वाहन चालवतात त्यांना मास्क घालण्याच्या अत्यावश्यकतेपासून सूट देण्यात आली आहे. एएफपीच्या अहवालानुसार नवीन नियम लागू होण्यापूर्वी पोलिस त्याबद्दल लोकांना माहिती देत आहेत.

आतापर्यंत जगातील सुमारे 50 देशांमध्ये मास्क घालणे आवश्यक केले गेले आहे. आफ्रिकेच्या देश चाडमध्ये मास्क न घातल्याने 15 दिवस तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्याच वेळी, मोरोक्कोमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यावर तीन महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कतार अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, रमजान महिन्यात लोकांचे एकत्र येणे हे देशात संसर्ग दर वाढण्यामागील कारण असू शकते. रमजान महिन्यात लोक एकत्र खायला जमा होतात .