‘जीन एडिटींग टूल’ने होऊ शकतो ‘कोरोना’चा ‘खात्मा’; ‘ही’ आहेत 6 खास वैशिष्ट्ये

पोलीसनामा ऑनलाइन – स्टॅनफोर्ट युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी दावा केला आहे की, त्यांनी एक असे जीन टूल तयार केलेय ज्या माध्यामातून इन्फेक्टेड सेल्समधील कोरोना व्हायरस नष्ट करता येऊ शकतो. या टूलचे नाव पॅकमॅन आहे. ते इन्फ्लूएंजा व्हायरसशी लढण्यासाठी बनवले आहे. याचा वापर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या फुफ्फुसामधील पेशींवर केला असता संशोधकांना 90 टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला.

असे आहे टुल

1 हे टूल कॅस 13 आणि आरएनए मिळून तयार केले आहे.

2 पॅकमॅनचा अर्थ प्रोफेलॅक्टिक अँटीवायरल क्रिस्पर इन ह्यूमन सेल्स असा आहे.

3 याद्वारे कोरोना व्हायरसच्या जिनोम सिक्वेंसला तोडता येते.

4 याचा वापर केल्यावर कोरोना व्हायरसची संख्या रुग्णाच्या शरीरात वाढू शकत नाही.

5 कोरोना व्हायरसला नष्ट करता येऊ शकते.

6 या टूलचे ट्रायल कोरोना इन्फेक्टेड प्राण्यांवर केले जाणार आहे.