Coronavirus Restrictions In Maharashtra | … तर वॉईन शॉप, दारुची दुकाने बंद करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने निर्बंध (Coronavirus Restrictions In Maharashtra) लागू केले आहेत. राज्यात सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध हे मोठ्या स्वरुपाचे आहेत. रुग्णसंख्या कितीही वाढली तरी जोपर्यंत ऑक्सिजन (Oxygen) आणि रुग्णालयांतील खाटांची मागणी एक निर्धारित मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत हे निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नाही. किंबहुना याच निर्बंधांमुळे (Coronavirus Restrictions In Maharashtra) राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात येईल अशी आशा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केली. ते मुंबईत बोलत होते.

राजेश टोपे म्हणाले, सध्या राज्यातील ऑक्सिजनची मागणी 270 मेट्रिक टनावरुन 350 मेट्रिक टन इतकी झाली आहे. मात्र, हे कोव्हिड (Covid) आणि नॉन-कोव्हिड रुग्णांसाठी (Non-Covid patient) लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनचे प्रमाण आहे. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण दिवसाला लागणाऱ्या 1700 ते 1800 मेट्रिक टनची मागणी पूर्ण केली आहे. सध्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना कमी प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागत आहे. त्यावरुन सध्याचा कोरोना विषाणू (Corona Virus) सौम्य वाटत असल्याचे टोपे यांनी म्हटले. (Coronavirus Restrictions In Maharashtra)

वाईन शॉप, दारुची दुकाने बंद करणार (Wine shops will be close)

सरकारला क्लासपेक्षा (शाळा) ग्लासची जास्त चिंता आहे, अशी टीका भाजपने (BJP) केली होती.
या टीकेला उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले, गर्दी होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी राज्य सरकार निर्बंध (Coronavirus Restrictions) लावणार आहे.
त्यामुळे वाईन शॉप (Wine Shop) आणि दारूच्या दुकानांमध्ये (Liquor Stores) गर्दी होत असेल तर तीदेखील बंद केली जातील, असेही टोपे यांनी सांगितले.

तर सरकार योग्य ती काळजी घेईल

कोरोनामुळे लहान मुलांना डायबेटिस (Diabetes) होण्याचे प्रमाण वाढत असल्याबद्दल आयसीएमआरने (ICMR) कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत.
केंद्र सरकारकडून (Central Government) तशा सूचना आल्यास राज्य सरकार योग्य ती काळजी घेईल असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Web Title :-  Coronavirus Restrictions In Maharashtra | then Wine shops liquor shops will be closed Health Minister Rajesh Tope warned

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Variant | तिसर्‍या डोससाठी बुक करावा लागणार नाही ‘स्लॉट’, असा घेऊ शकता डोस; मुलांबाबत व्हॅक्सीन कंपनीने दिला ‘हा’ इशारा

 

Pune Crime | खराडीत 2 कुटुंबात झाली हाणामारी, 7 जणांवर गुन्हा ! भांडणामागचे कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण

 

Girish Mahajan | गिरीश महाजन ‘गोत्यात’? पुणे पोलिसांचे 50 जणांचे पथक जळगावात दाखल; जाणून घ्या प्रकरण