‘कोरोना’ व्हायरसच्या नावानं होतोय ‘ऑनलाईन’ फ्रॉड आणि हॅकिंग, तुम्हाला आलाय ‘मेल’ तर व्हा सावध, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1700 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. या व्हायरसची लागण सुमारे 70 हजार लोकांना झाली आहे. संपूर्ण जगावर या व्हायरसचे सावट आहे. परंतु, काही लोक या स्थितीचा फायदा उचलत आहेत. मागील काही दिवसापासून सायबर गुन्हेगार लागोपाठ लोकांना मेसेज पाठवून कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याचे उपाय सांगत आहेत. परंतु, असा ईमेल ओपन केल्यानंतर त्याच्यातील स्टेप फॉलो करताच सिस्टम हॅक केली जात आहे.

सिक्युरिटी फर्म माईमकास्टला असाच एक ईमेल सापडला आहे, ज्यामध्ये कोरोना व्हायरसपासून वाचण्याचा उपाय सांगितला आहे. धक्कादायक हे आहे की, या मेलमध्ये तुमच्याकडे काही मागण्यात येत नाही तर तुम्हाला वाचण्यासाठी उपाय सांगितले जात आहेत. या मेलमध्ये जागतिक आरोग्य संघटनेची सूचनाही दिली गेली आहे. परंतु लोकांनी हा मेल आपेन करून यातील पीडिएफ फाईल उघडल्यास सिस्टम हॅक होत आहे. अनेक लोक या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत.

अशा प्रकारचे मेल पाठवणार्‍या हॅकर्सने जागतिक आरोग्य संघटनेची लिंक सुद्धा दिली आहे. या मेलमध्ये एक लिंक असून तिच्यावर क्लिक केल्यानंतर एक पॉप अप विंडो उघडते. येथे तुम्हाला तुमचा इमेल कन्फर्म करण्यास सांगितले जोते. यासोबतच तुमच्याकडे अन्य माहितीही मागितली जाते. युजर्सने ही माहिती दिल्यानंतर एक डॉक्युमेंट डाऊनलोक करण्यास सांगितले जाते. यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करताच अकाउंट हॅक होते. यामध्ये कोरोना व्हायरसपासून वाचण्याचा उपाय आहे, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचे अकाउंट हॅक होते.