Coronavirus : चीनमध्ये पुन्हा वटवाघुळाची विक्री ! अभिनेत्री रवीना टंडन प्रचंड ‘संतापली’

पोलीसनामा ऑनलाईन :चीनमध्ये पुन्हा एकदा वटवाघूळ, बकरी, कुत्रा, मांजर यांची विक्री होण्या संदर्भातल्या बातम्या व्हायरल होताना दिसत आहेत. असं म्हटलं जात आहे की, कोरोना सारखा व्हायरस पसरण्याचं कारण या जनावरांना खाणं आहे. चीनमधील स्थिती आटोक्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा याची विक्री सुरू झाली आहे अशी माहिती आहे. यावर आता बॉलिवूड अॅक्ट्रेस रवीना टंडन नाराज झाली आहे. चीन जनावरांना वाईट वागणून देणारा आहे असं म्हणत तिनं हा जगातील सर्वात खराब देश असल्याचंही म्हटलं आहे.

रवीनानं ट्विट करत म्हटलं आहे की, “माणूस कधीही धडा न घेणारा जीव आहे. या कारणांमुळंच एवढे बळी द्यावे लागले आहेत. तरीही माणूस पुन्हा एकदा त्या असभ्य सवयींकडे गेला आहे. जनावरांसोबत वाईट वर्तणूक करण्याच्या बाबतीत चीन सर्वात खराब आणि वाईट देश आहे.” सध्या रवीनाचं ट्विट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

याआधी रवीना एका व्हिडीओमुळं चर्चेत आली होती. यात तिनं सांगितलं होतं की, कोरोना व्हायरसला हलक्यात घेऊ नका. याला गांभीर्यानं घेतलं नाही तर आपण फक्त आपलं कुटुंबच नाही तर देशालाही धोक्यात टाकत आहोत. कोरोना पासून वाचण्यासाठी सर्वांना घरातच राहणं गरजेचं आहे. कोणालाही भेटू नका. कारण हा व्हायरस खूप वेगानं पसरत आहे असंही ती म्हणाली होती.

Cinque Terre
You might also like