Coronavirus : कोरोनामुक्त झालेल्यांना ‘या’ गंभीर आजाराचा धोका, संशोधनातून धक्कादायक खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – यंदाच्या कोरोना लाटेने जगात हाहाकार केला आहे. देशात तर बेकार परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्याच्या सेवा सुद्धा अपुऱ्या पडत आहेत. कोरोना विषाणू माणसाला जीवघेणा हल्ला करत आहे. तर दुसरीकडे आता कोरोनाच्या म्यूटेशननंतर नवीनच बदल पुढं येत आहे. ज्या लोकांना आधीच आजार आहे. तसेच कोरोनाच्या नव्या माहितीनुसार मधुमेहाचा आजार असणाऱ्या लोकांना अधिक धोका दिसत आहे. कोरोनामुळे चांगले झालेल्या लोकांना आता मधुमेहाच्या आजाराचा विळखा बसत आहे.

याबाबत केलेल्या संशोधनानुसार एक धक्कादायक बाब समोर आलीय. त्यानुसार कोरोना आजारातून जे लोक मुक्त झाले आहेत त्या लोकांमध्ये आता मधुमेहाच्या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. तर जे लोक कोरोनाच्या मेजर लक्षणांचे शिकार झाले आहेत त्यांच्यात मधुमेह देखील आढळून येत आहे. असे किंग्स कॉलेज लंडनचे MD प्रा. फ्रान्सेस्को रूबिनो सांगितले आहे. त्यांनी मधुमेह आणि कोरोना यांच्यातील संबंधाबाबत काही बाब सांगितले आहेत.

वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार –
कोरोनाबरोबर मधुमेहाच्या संबंधाबाबत काही माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये विविध विचार आहेत. जे लोक टाइप १ आणि टाइप २ मधुमेहाचे शिकार आहेत त्यांना कोरोनाचे तीव्र लक्षणे दिसत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोनासाठी टाइप २ मधुमेह एक मोठा घटक असू शकतो. तसेच, वैज्ञानिकांनी चीनच्या हुबेई प्रांतात ७३३७ कोव्हिडच्या रूग्णांवर एक अभ्यास केला. यामधील ९५२ रूग्ण अगोदर पासून टाइप २ मधुमेहाने ग्रस्त होते. टाइप मधुमेह असलेल्या कोरोना रूग्णांना अधिक मेडिकल ट्रिटमेंटीची आवश्यकता असते आणि त्यांच्यात मृत्युचे प्रमाण देखील अधिक असतो. अशी माहिती संशोधनावरून समोर आलीय.

शुगर पातळीवर लक्ष देण्याची आवश्यकता –
अमेरिकेच्या मधुमेह संस्थेनुसार, साखर असणाऱ्या आजारात रूग्ण फ्लूसारख्या संसर्गाबरोबर निपटण्या दरम्यान अनेक प्रकारचा धोका पत्करतात. त्यामुळे कोरोना त्यांच्यासाठी धोक्याचा असतो. मधुमेहाने पीडित नागरिकांना सर्वाधिक धोका कोरोनाचा आहे. असे तज्ज्ञाकडून सांगण्यात आले आहे. साखरेच्या पातळीमध्ये कमी जास्त झाल्यावर हा असणारा धोका जास्त वाढतो. जेव्हा साखरेचे प्रमाण वाढले तेव्हा आपली रोग प्रतिकारशक्ती कमजोर बनते. ज्यामुळे लोक लवकर आजारी पडतो आणि संसर्गापासून लढण्याची क्षमताही गमावतो देतो. थोडक्यात म्हणजे, साखरेचा स्तर कमी झाल्यानेच मधुमेह असलेल्या कोरोना संसर्ग रुग्णांना जास्त धोका ठरतो. म्हणून साखर आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे.

मधुमेहाची संख्या वाढली –
कोरोनाच्या काळात मधुमेहाच्या रुग्णाची संख्या वाढली आहे. आताच्या संशोधनानुसार असं पुढं आलं आहे कि, काही लोकांमध्ये कोरोनाचे संसर्ग झाल्यावर मधुमेहाचे लक्षणे दिसून येत आहेत. अमेरिकन वैज्ञानिकाचा माहितीनुसार, कोरोना चे अनेक रुग्ण ज्यामध्ये मधुमेहाची लक्षणे नव्हती. त्यांच्यामध्ये अचानक मधुमेहाची लक्षणे आढळून येत आहेत. हे लक्षात घेता इंग्लंडमधील किंग्स कॉलेज लंडन आणि ऑस्ट्रेलियातील मोनाश यूनिव्हर्सिटीने एक कोविडियाब नोंदणी बनवली गेली आहे. यामध्ये डॉक्टरांना अशा रूग्णांची माहिती द्यायची होती ज्यांना कोरोनानंतर मधुमेहाची लक्षणे आहेत.