Coronavirus : काय सांगता ! होय, नव्वदीतल्या जोडप्यानं हरवलं ‘कोरोना’ व्हायरसला

पोलीसनामा ऑनलाइन –  जगभरात कोरोनामुळे वृद्धांचा मृत्यू सर्वात जास्त होत असल्याचे सांगितले जाते.यातच इटलीमधील १०२ वर्षीय वृद्ध महिलेने कोरोनाशी सामना केल्याची बातमी अलीकडेच आलेली. तसेच काही आपल्या देशात केरळ मध्ये घडलं आहे.केरळमधील नव्वदी पार केलेल्या एका वृद्ध दाम्पत्याने कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे.विशेष असं की अनेक व्याधींनी ग्रासलेलं असताना या दाम्पत्यांनी कोरोनाशी कसा सामना केला याबाबत डॉक्टरांच्या मनातही शंका आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, थॉमस (वय ९०) मरियम्मा (वय ८८) असं कोरोनावर मात करणाऱ्या दाम्पत्यांची नावे आहे. या दोघांनाही अनेक वर्षांपासून अनेक व्याधींनी ग्रासलं होत. त्यामध्येच त्यांना कोरोना संसर्गाची लागण झाली.दोन्ही दाम्पत्यावर कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु होते. आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले की ते व्यवस्थित बरे असल्याने दोघांनाही आता डिस्चार्ज देण्यात आला आहे.यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना टाळ्या वाजवून निरोप दिला.या सर्वच प्रेम पाहून दाम्पत्यही भावुक झाले.

या दाम्पत्याचा मुलगा आपल्या पत्नी व मुलासह २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून केरळ मध्ये आले.या तिघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.त्यांच्या मुळे त्यांच्या आई-वडिलांनाही संसर्गाची लागण झाली.लागलीच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र तेव्हा थॉमस यांना हृदयविकाराचा झटका आला,तर मरियम्मा यांना जंतू संसर्ग झाला.या दोघांवर उपचार करणाऱ्या नर्सची चाचणी देखील कोरोना पॉझिटिव्ह आली.दरम्यान,या दाम्पत्याच्या कुटुंबातील मुलगा,सून,नातू आणि इतर दोन नातेवाईकांवर उपचार केल्यानंतर चाचणी निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज देण्यात आला.

इटलीहून आलेल्या या दाम्पत्याच्या मुलावरती केरळच्या आरोग्य विभागाने ताशेरे ओढले होते. कारण कोची विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांची तपासणी केली नव्हती.तसेच आपल्या परदेश दौऱ्याची बातमी देखील लपवून ठेवली होती.त्यांनी सोशल डिस्टंसिंगचंही पालन केलं नव्हतं.तसेच इटली मधून आल्यानंतर अनेक कार्यक्रमांना देखील हजेरी लावली होती.या काळात तब्बल ९०० जण त्यांच्या संपर्कात आले होते.त्यांना केरळ आरोग्य विभागाने होम क्वारंटाइन केलं आहे.