कसा होणार कोरोनावर प्रहार? 1 मेपासून MP-महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांत 18+ च्या लसीकरणाला ग्रहण, पहा पूर्ण लिस्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढाईत लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यांतर्गत 1 मेपासून 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना व्हॅक्सीन दिली जाणार आहे, मात्र, अशी काही राज्य आहेत, जिथे हे शक्य होईल असे वाटत नाही. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातनंतर आता पंजाब, आंध्र प्रदेश आणि तेलंगानामध्ये सुद्धा 1 मेपासून सर्व प्रौढांच्या लसीकरणावर सध्या ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. या राज्यांनी म्हटले आहे आहे की, त्यांच्याकडे योग्य प्रमाणात व्हॅक्सीनचे डोस उपलब्ध नाहीत, अशावेळी लसीकरणाची सुरुवात करणे शक्य नाही. यापूर्वी राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगढ, कर्नाटक आणि तमिळनाडुने सुद्धा अशाच प्रकारच्या अडचणी केंद्रासमोर मांडल्या आहेत.

* मध्य प्रदेश
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले, 1 मेपासून लसीकरण सुरू होऊ शकणार नाही. डोस योग्यप्रमाणात उपलब्ध नाहीत. तीन मेपासून लसीकरण होऊ शकते. लोकांनी संखम बाळगावा.

* पंजाब
पंजाबचे आरोग्य मंत्री बलबीर सिंह सिद्धू म्हणाले, आम्हाला व्हॅक्सीनचे आवश्यक डोस मिळत नाही. सर्व व्यवस्था उपलब्ध आहे. सीरमला 30 लाख कोविशील्ड डोसची ऑर्डर दिली आहे.

* गुजरात
गुजरात सरकारने म्हटले, योग्यप्रमाणात लस मिळाली तरच तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण सुरू होईल. मात्र 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंतची नोंदणी सुरू झाली आहे. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या 50 लाख डोसची ऑर्डर दिली होती.

* तेलंगाना
तेलंगानाचे जन आरोग्य महासंचालक जी श्रीनिवास राव म्हणाले, राज्य सरकार लस कंपन्यांच्या संपर्कात आहे. परंतु लस कधी मिळेल याबाबत ठोस माहिती दिली जात नाही. आम्हाला चार कोटी डोसची आवश्यकता आहे.

* आंध्र
तर, आंध्रच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनुसार, राज्य सरकारने लस कंपन्यांना पुरवठ्यासाठी पत्र लिहिले होते आणि मात्र त्यांच्याकडून कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. 18-44 वर्षाच्या लसीकरणाला उशीर होऊ शकतो.

* महाराष्ट्र
महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले, योग्य प्रमाणात लसीचा साठा मिळाला नाही तर पुढील दोन दिवस लसीकरण थांबवावे लागेल. एक मेपासून अभियान सुरू करणे अवघड आहे.

* बिहार
बिहारमध्ये सुद्धा लस उपलब्ध नसल्याने 1 मेपासूनचे लसीकरण सुरू होऊ शकणार नाही. आरोग्य समितीचे कार्यकारी संचालक मनोज कुमार म्हणाले, नोंदणी सुरू आहे, परंतु लसीकरणाचे स्थळ आणि वेळ ठरवू शकत नाही. लस मिळाल्यानंतरच हे शक्य आहे.

* झारखंड
झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता म्हणाले, झारखंडमध्ये 18+ लोकांचे लसीकरण एक मेपासून सुरूहोऊ शकणार नाही. कारण सरकारकडे लस उपलब्ध नाही. फ्रीमध्ये लसीकरण करण्याची तयारी झाली आहे. दोन्ही कंपन्यांना 25-25 लाख डोसची ऑर्डर दिली आहे. परंतु कंपन्यांनी 15 मेपूर्वी लस उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.