Coronavirus : ‘कोरोना’पासून तुमच्या वाहनांना सुरक्षित ठेवायचंय, ‘या’ आहेत 6 सोप्या पध्दती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस या दिवसात अत्यंत गंभीर प्रकरण होत चालले असून आता देशात २३० पेक्षा जास्त लोकं संक्रमित असल्याचे समोर आले आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण असे नाही कि या व्हायरसला रोखण्याचा प्रयत्न सरकारनेच केला पाहिजे. याला रोखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या व्हायरसला रोखण्याची सर्वात योग्य पद्धत म्हणजे सॅनिटायझरचा वापर करणे.

या व्हायरसपासून बचावासाठी आपण आपल्या घराला पूर्णपणे सॅनिटाइझ केले पाहिजे. यासह जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्हालाही लक्ष ठेवले पाहिजे. जाणून घेऊया ६ पद्धतीने आपण आपल्या कारला कोरोना व्हायरसपासून कसे मुक्त ठेवू शकता.

१. जर तुम्ही ड्राइव्हसाठी बाहेर पडला तर तुम्ही तुमचे हात चांगले धुवून घ्या. यामुळे तुमची गाडी पहिल्या वेळी दूषित होण्यापासून वाचेल. यानंतर पूर्ण राइड झाल्यावरही तुम्ही हात धुवून घ्या. तुम्ही तुमच्या कारमध्ये सॅनिटायझर आणि टिशू पेपरही ठेवला पाहिजे.

२. कारला चांगले साफ करा. जर कोणती संक्रमित व्यक्ती तुमच्या कारमध्ये चुकून बसली तर त्याच्या श्वासोच्छवासाच्या माध्यमातून हा व्हायरस कारमध्ये येईल आणि हा व्हायरस काही दिवस सक्रिय राहू शकतो. यासाठी कारला पूर्णपणे चांगले साफ केले पाहिजे.

३. सतत हात लागणाऱ्या कारमधील जागेला स्वच्छ ठेवा. यात दरवाजाचे हॅण्डल, स्टियरिंग व्हील, गियर लिव्हर आणि हॅन्ड ब्रेक सारख्या जागा आहेत. अशा जागेला सतत सॅनिटायझरने साफ करणे गरजेचे आहे.

४. कोरोनापासून बचावासाठी आपल्या कारच्या अपहोल्सरी सारख्या हेडरेस्ट, सीटबॅक पॉकेट, बॅकरेस्ट आणि आर्मरेस्टलाही साफ केले पाहिजे. या सगळ्या वस्तू साफ करण्यासाठी तुम्ही साबणाच्या पाण्याचा वापर करू शकता.

५. कोविड-१९ वायरसला अनेक घातक आजारांसाठी जबाबदार ठरवले जात आहे. अशात बॅक्टेरिया तुमच्या एयर-कंडिशनिंग सिस्टममध्येही जागा बनवू शकतो. अशात आपली एसी-सिस्टम सतत साफ करत राहा. नेहमी एयर-कंडिशनिंगची सर्व्हिस एका प्रोफेशनल व्यक्तिकडून केली पाहिजे.

६. तुम्हाला माहीतच असेल कि हा व्हायरस संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने होतो. यासाठी तुम्ही जेवढे शक्य तेवढे लोकांपासून लांब राहिले पाहिजे. जर तुम्ही जास्तीत जास्त सामाजिक अंतर ठेवले तर तुमच्या कारचा वापर कमी करावा लागेल.