Unlock 4 : अनलॉक 4 मध्ये कोण-कोणत्या गोष्टी चालू आणि काय असणार बंद, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना महामारी दरम्यान अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक – 4 साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 7 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू केल्या जातील. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेले हे मार्गदर्शक तत्त्वे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत लागू होतील.

अनलॉक -4 मध्ये सुरु होणार या गोष्टी :

– मार्गदर्शक सूचनांसह 7 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

– 21 सप्टेंबरपासून सामाजिक, शैक्षणिक, खेळ, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम 100 लोकांसह आयोजित केले जाऊ शकतात. या दरम्यान, सामाजिक अंतर, मास्क, हँडवॉश, थर्मल स्कॅनिंग अनिवार्य असेल.

– 21 सप्टेंबरपासून 50 टक्के टिचिंग आणि नॉन टिचिंग कर्मचाऱ्यांना ऑनलाईन वर्गांसाठी शाळेत बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे.

– 21 सप्टेंबरपासून 9 वी ते 12 वीचे विद्यार्थी त्यांच्या कुटूंबाच्या संमतीनंतर शिक्षकांना भेटण्यासाठी शाळेत जाऊ शकतील.

– एका राज्यातून दुसर्‍या राज्यात किंवा त्याच राज्यात लोकांच्या हालचालीवर कोणतेही बंधन नसेल तसेच परवानगी घेण्याचीही आवश्यकता भासणार नाही. हे महत्त्वाचे आहे कारण केंद्र सरकारने असे म्हटले असूनही काही राज्ये त्यांच्या प्रवेश बंदीवर अडून आहेत.

– तांत्रिक आणि व्यावसायिक कार्यक्रम ज्यात लॅब किंवा प्रॅक्टिकल प्रॉजेक्टची आवश्यकता असणाऱ्या पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्था 21 सप्टेंबरपासून उघडल्या जाऊ शकतात.

– राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास अभियान किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर मंत्रालयांसह नोंदणीकृत केंद्रात कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण उघडण्यास अनुमती दिली जाईल..

हे निर्बंध कायम राहतील

– सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर (ओपन एअर थिएटर वगळता) आणि अशा ठिकाणी क्रियाकलाप प्रतिबंधित असतील.

– कोणतेही राज्य केंद्राचा सल्ला घेतल्याखेरीज कंटेनमेंट झोनच्या बाहेर स्थानिक लॉकडाउन लादू शकत नाही. जर राज्यांना कंटेनमेंट झोनबाहेर लॉकडाउन लागू करायचे असेल तर त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल.