संपूर्ण जगाला आशेचा किरण दाखवणारी ऑक्सफर्डची ‘कोरोना’ लस शास्त्रज्ञांमुळेच अडचणीत, जाणून घ्या प्रकरण

लंडन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला असताना अनेक देश कोरोनावर लस तयार करत आहेत. संपूर्ण जगाच लक्ष कोरोनाची लस कधी येणार याकडे लागले आहे. यातच कोरोना लसीवरून दोन ब्रिटीश शास्त्रज्ञांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे दोन्ही शास्त्रज्ञांमध्ये कोरोना व्हायरस लशीच्या चाचणी प्रक्रियेवरून वाद सुरु झाला आहे. सध्या ऑक्सफर्ड कोरोना चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे.

एका वृत्तानुसार प्रोफेसर अ‍ॅड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यात एखाद्या चाचणीसाठी लोकांना मुद्दाम कोरोना संक्रमित करायचे की नाही यावरुन वाद सुर झाला आहे. प्रोफेसर अ‍ॅड्रियन हिल यांनी निरोगी स्वयंसेवकांना लस दिल्यानंतर कोरोनानं संक्रमित करावे, असे सांगितले होते. दरम्यान कोरोनाची लशीची चाचणी यशस्वी तेव्हाच समजली जाते जेव्हा, लस वापरणारे बहुतेक लोक कोरोनाच्या संपर्कात आले तरी त्यांना त्याची लागण होणार नाही. एकीकडे ब्रिटनमध्ये रुग्णांची संख्या कमी होत आहे, अशा परिस्थितीत चाचणी यशस्वी होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे.

यापूर्वी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची योजना होती की, काही स्वयंसेवक लस दिली जात आहे, ते स्वत: येत्या काळात व्हायरसच्या संपर्कात येऊ शकतात. मात्र, आता प्रोफेसर अ‍ॅड्रियन हिल यांना काही स्वयंसेवकांना कोरोना संक्रमित करायचे आहे. मात्र, एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर सारा गिलबर्ट या अ‍ॅड्रियन हिल यांच्याशी सहमत नाहीत.

वैज्ञानिकांनी स्वयंसेवकांना कोरोना संक्रमित केले तर लसीच्या चाचणीचे निकाल लवकर येऊ शकतात. मात्र, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा दोन्ही शास्त्रज्ञ सहमत असतील आणि चाचणीच्या प्रस्तावाला एनएचएसच्या अेथिक्सकडून मान्यता मिळेल. सध्यातरी दोन्ही शास्त्रज्ञांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.