Coronavirus Vaccine : कोविड-19 मधून रिकव्हर झालेल्या लोकांना व्हॅक्सीनमुळे होते का गंभीर रिअ‍ॅक्शन?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जे लोक कोरोनातून (Corona) नुकतेच बरे झाले आहेत, त्यांना अ‍ॅडव्हायजरी व्हॅक्सीन (Coronavirus Vaccine) घेण्यापूर्वी किमान 90 दिवसांची प्रतिक्षा करण्याचा सल्ला देत आहे. केस स्टडीजसह अनेक प्रकरणे दिसून आली, यावरून हे स्पष्ट समजते की, जे लोक कोविड-19 (Covid-19) मधून रिकव्हर झाले आहेत, त्यांच्यात व्हॅक्सीनची रिअ‍ॅक्शन थोडी जास्त दिसत आहे. Coronavirus Vaccine | health do coronavirus surs experience stronger reactions after getting vaccines

उदहाणार्थ, व्हॅक्सीनचे साईड-इफेक्ट्स सुद्धा त्या लोकांमध्ये जास्त दिसतात, जे अलिकडेच कोविडमधून रिकव्हर झाले आहेत. परंतु असे का होते?

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

व्हॅक्सीनची गंभीर रिअ‍ॅक्शन
एक व्हॅक्सीन शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला विषाणूंना ओळखणे किंवा संसर्गजन्य संसर्गाविरूद्ध अ‍ॅक्शन घेण्यास शिकवते, जी अनुवंशिक निर्देश किंवा प्रोटीनच्या माध्यमातून एका संशोधित रूपात इंजेक्ट केली जाते. अशाप्रकारचे ’प्रशिक्षण’ आपल्या शरीराला काही इम्फ्लामेट्री प्रतिक्रियांना दूर करण्यासाठी प्रेरित करते, ज्यांना आपण साईड-इफेक्ट्स समजतो. या प्रतिक्रियांना सामान्यपणे शरीरात बी-पेशी आणि प्रतिकारशक्ती टी-पेशींद्वारे ट्रिगर केले जाते.

आता, व्हॅक्सीन घेतल्यानंतर आपल्याला ज्या साईड-इफेक्ट्सचा अनुभव येतो, ते लोकांना वेगळ्या प्रकारे प्रभावित करतात, काही लोकांना हलक्या प्रकारे, तर काहींना जास्त तीव्र प्रतिक्रिया जाणवते. हे आपल्या प्रतिकारशक्ती प्रणालीच्या विषाणूंप्रति प्रतिक्रिया करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळे आहे.

साईड-इफेक्ट्स सुद्धा वेगळ्या प्रकाराने प्रभावित होऊ शकतात. जर प्रतिकारशक्तीला अगोदरच व्हायरस (Virus) बाबत माहिती असेल किंवा एखाद्या प्रकारे याच्याशी सामना केलेला असेल. हेच कारण आहे की अनेक लोकांचे म्हणणे आहे की, जे लोक कोविड-19 मधून बरे झाले आहेत त्यांच्यात व्हॅक्सीनची प्रतिक्रिया जास्त दिसते. ती सिस्टममध्ये मेमरी-बी पेशींद्वारे करण्यात आलेली भूमिका आहे.

व्हॅक्सीनच्या गंभीर साईड-इफेक्ट्सची चिंता करावी का?
बहुतांश लोकांना कोविड व्हॅक्सीनचे (Coronavirus Vaccine) हलके साईड-इफेक्ट्स जाणवतात, जे एक-दोन दिवसात आपोआप निघून जातात. मात्र, गंभीर साईड-इफेक्ट झाल्यास तुम्हाला औषधांची मदत घ्यावी लागू शकते आणि यासाठी जास्त वेळ सुद्धा लागू शकतो. ज्या लोकांनी कोविड रिकव्हरीनंतर व्हॅक्सीन घेतली, त्यांना डोकेदुखी, हातात वेदना आणि अस्वस्था जास्त काळ जाणवली.

एक्सपर्टचे काय म्हणणे आहे?
एक्सपर्टचे म्हणणे आहे की, गंभीर साईड-इफेक्ट्स बाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही.
व्हॅक्सीनच्या गंभीर रिअ‍ॅक्शनमागे प्रमुख कारणांपैकी एक हे सुद्धा आहे.
की, कोविडमधून बरे झालेल्या रूग्णांची प्रतिकारशक्ती अगोदरपासूनच व्हायरसप्रति प्रतिक्रिया करण्यासाठी तयार असते, आणि नंतर व्हॅक्सीन घेतल्यानंतर याची प्रतिक्रिया वाढते.

तुम्ही कधी अलर्ट झाले पाहिजे?
व्हॅक्सीनचे साईड-इफेक्ट्स प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळ्या प्रकारचे असू शकतात.
परंतु तरीसुद्धा तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की.
कशाप्रकारच्या साईड-इफेक्ट्सवर डॉक्टरकडून सल्ला आवश्यक आहे.
व्हॅक्सीन घेतल्याच्या 5 दिवसानंतर सुद्धा साईड-इफेक्ट्स कमी किंवा संपले नाहीत.
तर मेडिकल मदत आवश्यक घ्या. व्हॅक्सीनच्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे, बेशुद्धी, सूज किंवा त्वचेशी संबंधी इतर रिअ‍ॅक्शन किंवा इतर बाबतीत व्यक्ती बेशुद्ध सुद्धा होतो, अशावेळी विना विलंब ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel :- Coronavirus Vaccine | health do coronavirus surs experience stronger reactions after getting vaccines

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित