Coronavirus : जीवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसवरील ‘लस’ तयार, पुढच्या महिन्यात मनुष्यावर ‘परिक्षण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात १०८,६१० लोक संक्रमित झाले आहेत. जवळपास ३८२५ लोकांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे युरोपियन युनियन आणि अमेरिका देखील त्रस्त झाले आहेत. याबाबत आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे की, अमेरिका आणि युनायटेड किंगडम (यूके) चे वैज्ञानिक पुढील महिन्यापासून माणसांवर कोरोना विषाणूच्या लस ची चाचणी घेणार आहेत. म्हणजेच यांनी मिळून कोरोनाची लस बनविली आहे.

पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये यूके आणि अमेरिकेने बनविलेल्या या लसीच्या ज्या मानवी चाचण्या सुरु होतील, त्यास युनिव्हर्सिटी ऑफ लंडन आणि अमेरिकन औषध कंपनी मॉडर्ना आणि इनवोइओ यांनी मिळून बनविले आहे. एका वृत्तानुसार जर मनुष्यांवर ही चाचणी यशस्वी झाली तर या लसीमुळे जगभरातील कोरोना विषाणूपासून संक्रमित झालेल्या लोकांचा उपचार करता येईल.

युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधील इम्पीरियल कॉलेजचे वैज्ञानिक आणि अमेरिकन औषध कंपनी हे दोन्हीही एप्रिल पासून मानवी चाचणी घेण्यास तयार आहेत. अमेरिकन औषध कंपनीने सांगितले आहे की, या संयुक्त मानवी चाचणी व्यतिरिक्त आम्ही आमच्या वतीने देखील मानवांची चाचणी घेऊ. इम्पिरियलचे वैज्ञानिक प्रोफेसर रॉबिन शैटॉक यांनी सांगितले की कोणतीही लस सुरुवातीला विषाणूला फक्त थांबवू शकते, कारण हे संक्रमण जास्त पसरू नये.

त्यानंतर अशी लस शोधली जाते, ज्यामुळे मानवाच्या शरीरातील विषाणू नाश पावतात किंवा मानवाच्या पेशी या विषाणूसोबत लढण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी सक्षम बनतात. प्रोफेसर रॉबिन शैटॉक यांनी सांगितले की जर ही चाचणी यशस्वी झाली तर आम्ही त्या देशांमध्ये ही औषधे पाठवणार जेथे कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.

अमेरिकन औषध कंपनी इनवोइओ ने सांगितले आहे की, जर ही चाचणी यशस्वी ठरली तर आम्ही या वर्षाअखेर १० लाख औषधे बनवून संपूर्ण जगात वाटणार. तसेच रॉबिन शैटॉक म्हणाले की सर्वसाधारणपणे कोणत्याही रोगाबाबत लस बनविण्यासाठी कमीत कमी ५ वर्षाचा तरी कालावधी लागत असतो. परंतु या वेळेस आम्ही रेकॉर्ड ब्रेक करत कोरोनाची लस बनविली आहे.

तसेच ते म्हणाले की, आता फक्त ही लस यशस्वी व्हायला पाहिजे. या लसीमध्ये २००३ मध्ये पसरलेली महामारी सार्स (SARS) याच्या औषधाचा देखील वापर करण्यात आला आहे. कारण त्यामुळे हे समजू शकेल की नवीन कोरोना विषाणू वर या लसीचा काय फरक पडतो.