Coronavirus : ज्यांना ‘कोरोना’चा सर्वाधिक धोका, त्यांच्यासाठी उपयुक्त नाही ठरणार लस ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शास्त्रज्ञांनी म्हटले की, असे होऊ शकते कि, ज्या रुग्णांना या विषाणूचा सर्वाधिक धोका आहे, त्यांच्यासाठी कोरोना व्हायरस लस कार्य करू शकणार नाही. म्हणजेच वृद्धांना कदाचित लसीचा फायदा मिळणार नाही. यासाठी शास्त्रज्ञांनी सुचविले की, जर वृद्धांच्या आजूबाजूस राहणाऱ्या लोकांना लस देऊन इम्यून केले तर त्यांचा धोका कमी होईल.

माहितीनुसार, लंडनच्या इम्पीरियल कॉलेजचे प्रोफेसर पीटर ओपेनशव यांनी ब्रिटीश संसदेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीला सांगितले की, ही लस देण्यासाठी वेगवेगळ्या गटांना टार्गेट करावे लागेल. ज्यांना सर्वाधिक धोका आहे, त्यांना वाचवण्यासाठी आम्ही त्यांच्या जवळ राहणाऱ्या गटाला लक्ष्य करुन त्यांना ही लस देऊ शकतो.

ब्रिटीश सोसायटी ऑफ इम्यूनोलॉजीचे अध्यक्ष अर्ने अकबर म्हणाले की, वृद्ध लोकांच्या रोगप्रतिकारक यंत्रणेत काय समस्या आहे हे वैज्ञानिकांना शोधून काढावे लागेल. ते म्हणाले की, हे स्पष्ट आहे की वृद्धापकाळातील निरोगी लोकांच्या शरीरात इन्फ्लेमिशन जास्त असते. त्यामुळे वृद्ध लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला लस तसेच इतर गोष्टींवर काम करावे लागेल. अशा लोकांना लस तसेच डेक्सामेथासोन सारख्या अँटी -इन्फ्लेमनरी औषधांचा फायदा होऊ शकतो. परंतु यासाठी शास्त्रज्ञांना अजून काम करावे लागेल.