‘कोरोना’चे आतापर्यंत 1.7 लाख बळी ! ‘ही तर सुरूवात आहे, खरा विनाश तर अजून दिसायचाय’, WHO कडनू धोक्याचा ‘इशारा’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  जगात कोरोना विषाणूमुळे एक लाख ७१ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक देशांमध्ये संक्रमण वेगाने पसरत आहे. संक्रमित लोकांची एकूण संख्या २४ लाख ९२ हजारांवर गेली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एधनॉम गेबरेयसेस यांनी सोमवारी असा इशारा दिला की कोरोना महामारीचा सर्वात वाईट काळ येणे अद्याप बाकी आहे.

डब्ल्यूएचओ प्रमुख स्वित्झर्लंडमधील पत्रकार परिषदेत म्हणाले – ‘आमच्यावर विश्वास ठेवा. कोरोनाचा सर्वात वाईट काळ पुढे आहे. आपण सर्वजण या अडचणीला थांबवू. बर्‍याच लोकांना अद्याप या विषाणूबद्दल समजलेले नाही.

एका वृत्तसंस्थेनुसार, डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस एधनॉम गेबरेयसेस म्हणाले – कृपया यावर विचार करा की जे लोक मरत आहेत ते कोणती संख्या किंवा आकडे नाहीत. केवळ एक जीवन देखील किमती असते.

गेबरेयसेस यांनी स्पष्ट केले नाही कि त्यांना असे का वाटत आहे कि कोरोनाचा सर्वात वाईट काळ अद्याप बाकी आहे. काही दिवसांपूर्वी गेबरेयसेस आणि इतर तज्ञांनी चिंता व्यक्त केली की कोरोना आफ्रिकेतही मोठ्या प्रमाणावर पसरू शकतो आणि त्यामुळे अधिक नाश होऊ शकतो.

आफ्रिकेतील बर्‍याच देशांमध्ये तीव्र दारिद्र्य आणि आरोग्य सेवा प्रणालीचा अभाव आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, आफ्रिकेतील असे १० देश आहेत जिथे रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर नाही.

न्यूज ब्रिफिंगमध्ये गेबरेयसेस यांनी १९१८ च्या स्पॅनिश फ्लूशी कोरोना विषाणूची तुलना केली. स्पॅनिश फ्लूची गणना मानवी इतिहासाच्या सर्वात धोकादायक महामारीमध्ये केली जाते.

डब्ल्यूएचओ प्रमुखांनी स्पॅनिश फ्लूशी तुलना करत असेही म्हटले कि आता आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, त्यामुळे आपण अशी दुर्घटना रोखू शकतो.