Coronavirus : ‘कोरोना’मुळे अमेरिकेत सुमारे 10 हजार लोकांचा मृत्यू, इटलीपेक्षा स्पेनमध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरात कोरोनाचा कहर वेगाने पसरत असून चीन, इटलीनंतर
आता अमेरिकेतही व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत संपूर्ण जगभरात जवळपास 13 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर जवळपास जवळपास 70 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन लाख 62 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. संसर्ग झालेल्यांची संख्या आता चीन आणि इटलीपेक्षाही स्पेन सर्वात पुढे आहे. तसेच, जगभरातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेरिकेत आतापर्यंत 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

युरोपमधील स्पेन कोरोना बाधितांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर असून स्पेनमध्ये एकूण 1 लाखा 32 हजार कोरोना बाधित आहेत. तर इटलीमध्ये 1 लाख 29 हजार कोरोनाग्रस्त आहेत. आता स्पेन युरोपमधील कोरोनाचे केंद्र बनले आहे. एकूण आकड्यांमध्ये जगभरात अमेरिकेनंतर स्पेन दुसर्‍या क्रमांकावर आहे. वॉशिंग्टनमध्ये असलेल्या जॉन्स हॉपकिंस युनिवर्सिटीमध्ये सेंटर फॉर सिस्टम सायन्स अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग (सीएसएसई)ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या एकूण 3 लाखा 37 हजार कोरोना बाधित अमेरिकेत आहेत.

तर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले असून इटलीमधील मृतांचा आकडा 15 हजार 887 वर पोहोचला आहे. त्यानंतर स्पेनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 12 हजार 641 मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 9 हजार 661 लोकांचा मृत्यू झाला आहे. सीएसएसईने सांगितलेल्या आकड्यांनुसार, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर कोरोनाचे मोठे केंद्र बनले आहे. येथे 3 हजार 565 लोकांना मृत्यू झाला आहे. तर 846 आणि 479 लोकांचा मृत्यू न्यूजर्सी आणि मिशिगनमध्ये झाला आहे.