‘या’ महिलेच्या डायरीमध्ये लपलय ‘कोरोना’चं डोळयानं पाहिलेलं ‘सिक्रेट’, सत्याला घाबरलं चीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील वुहानमधून उद्भवलेला हा विषाणू जरी जगभरात पसरला आहे, पण चीन सुरुवातीपासूनच याबाबतची माहिती आणि सूचनांबाबत मनमानी कारभार करत आहे. जगाला त्यांनी सुरुवातीला माहिती दिली नाही किंवा अन्य देशांना याबाबत समजावून सांगू शकले नाही. यादरम्यान चीनमधील वुहान शहरात लॉकडाऊन दरम्यान एका महिलेने लिहिलेली डायरी समोर आली आहे.

खरं तर, ज्या वेळी चीनच्या वुहानमध्ये कोरोना पसरला होता, त्यावेळेस फॅंग-फॅंग नावाची महिला रोज डायरी लिहायची आणि ती वुहानमधील सर्व सत्य डायरीत लिहित होती. तिने मृत्यू, शोक आणि यातना या सर्वांची कहाणी लिहिली. सुरुवातीला चीनच्या लोकांनाही याचे वेड लागले, परंतु ही संपूर्ण कहानी जर्मन आणि इंग्रजीमध्ये येत असल्याचे समजताच त्यांनी या नायिकेला खलनायक बनवले आणि मग फॅंग-फॅंगला जीवघेणा धमक्या येऊ लागल्या.

पुरस्कारप्राप्त लेखिका फॅंग-फॅंगला आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असून ही धमकी स्वतः चीनकडून मिळाली आहे. आणि फॅंग-फॅंगचा दोष असा आहे की त्यांनी चीनमध्ये घडलेले सत्य सांगितले. त्यांनी या वुहान विषाणूबद्दल लिहिले आहे, ज्यामुळे जगभरात संकट निर्माण झाले आहे. त्यांनी ७६ दिवसांच्या वुहान लॉकडाउनमध्ये डायरी लिहिले आहे.

फॅंग-फॅंग यांनी त्यावेळेची वुहानची परिस्थिती, चायना अथॉरिटीची करतूत, रुग्णालयांमधील रूग्णांची दयनीय अवस्था, स्मशानभूमी व स्मशानभूमीत शोक व्यक्त करणे, याबाबत लिहिले. एवढेच नव्हे तर त्यांनी ते सर्व लिहून ऑनलाईनही केले. या भीतीने चीन त्यांच्या मागे लागला आहे.

काय आहे वुहान डायरी?
वास्तविक फॅंग-फॅंगची ही वुहान डायरी जर्मन आणि इंग्रजीमध्ये आली असताना डायरीच्या ऑनलाईन आवृत्तीत फॅंग-फॅंगने एकूण ६४ पोस्ट्स टाकल्या आहेत. एका चांगल्या रिपोर्टरसारखे जे पाहिले ते लिहिले, जे ऐकले ते लिहिले. जेव्हा जगाला कोरोनाबाबत नीट माहितही नव्हते तेव्हा त्यांनी डॉक्टरांच्या हवाल्यातून जगाला सांगितले की हा आजार संसर्गजन्य आहे. त्यांचा स्पष्टोक्तपणा लोकांना आवडला आणि अनेकांना फॅंग-फॅंगच्या लिखाणाची खात्री पटली.

जर त्यांच्या डायरीची काही पाने पाहिली तर १३ फेब्रुवारी रोजी फॅंग-फॅंगने स्मशानभूमीचा फोटो टाकत लिहिले, ‘माझ्या एका डॉक्टर मित्राने मला हा फोटो पाठवला होता. इथे चारही बाजूला मोबाइल फोन पडले आहेत. या मोबाईलचा कोणी मालकही होता.”

त्यादरम्यान जेव्हा चीन सरकार मृत्यूंची संख्या लपवत होते, फॅंग-फॅंगने उघडकीस आणले कि स्मशानभूमीत मोबाइल पडले होते, ते पडलेले मोबाइल याचे संकेत होते कि कोणत्या वेगाने मृत्यू होत होते.

१७ फेब्रुवारीच्या पानावर फॅंग-फॅंगने लिहिले, ‘रुग्णालय किती दिवस मृत्यूचे दाखले वाटत राहणार आणि किती मृतदेह मृतदेहांच्या वाहनांमध्ये स्मशानभूमीत नेणार आणि ही वाहने कित्येक दिवस अनेक फेऱ्या करत राहणार.’

फॅंग-फॅंगचा हेतू फक्त मृत्यूची गाथा लिहिणे नव्हता. त्यांनी रुग्णालयांच्या दुरावस्थेविषयी देखील लिहिले. रुग्णालयात जागा नाही, डॉक्टर रूग्णांना पाहू शकत नाहीत, कोणालाही कोणाची चिंता नाही. हे सर्व त्यांनी लिहिले.

फॅंग-फॅंगने लिहिले त्याप्रमाणेच हे घडले. पाश्चात्य देशांमधील उपग्रह सांगत होते की वुहान मध्ये अनेक मृतदेह जाळले जात होते. मृतदेह इतके होते कि उपग्रह वरती हवेत सल्फरच्या प्रमाणाचा अंदाज लावून मृतांचा आकडा दर्शवत होते. पाश्चात्य देशांमध्ये याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. पण चीनच्या रेकॉर्ड बुकमध्ये मृतांचा आकडा ३५०० आहे. चीनने गेल्या आठवड्यात या आकडेवारीत किंचित सुधारणा केली आहे.

वुहान डायरीची लेखिका फॅंग-फॅंगने जे आपल्या डोळ्यांनी पाहिले, ते जगाला सांगितले. त्यांनी मृत्यूची कहाणी सांगितली. चीनची लबाडी सांगितली. डोळ्यांनी पाहिलेले कोरोनाचे रूप सांगितले. आपल्या शहरातील वुहानमधील मृत्यूच्या तांडवाचे कारण सांगितले.

चीन फॅंग-फॅंगच्या जीवाचा शत्रू बनला असला तरी त्या आपल्या लेखणीवर ठाम आहेत. म्हणूनच चीनचे ते सत्य समोर येत आहे, जे आतापर्यंत जगाला माहित नव्हते. एकंदरीत चीनने कितीही बाजू मांडली तरी वुहान डायरीच्या लेखिकेने केलेल्या खुलासामुळे तिचा खरा चेहरा उघड झाला आहे.