‘कोरोना’वरील औषध ‘कोरोनिल’ लाँच, किती असणार किंमत आणि कधी मिळणार ? बाबा रामदेव यांनी केलं स्पष्ट

हरिद्वार : वृत्तसंस्था – पतंजली रिसर्च सेंटरकडून कोरोनावर मात करण्यासाठी कोरोनिल औषध लाँच करण्यात आले आहे. कोरोनिल औषधामुळे तीन दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण बरा होतो, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. पंतजलीकडून कोरोनिल औषध हे लवकरच बाजारात उपलब्ध केले जाणार असल्याची घोषणा आज (मंगळवार) बाबा रामदेव यांनी केली आहे. हरिद्वारमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोनिल औषध लाँच करण्यात आले. कोरोनिल औषध हे सात दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहे. पतंजलीच्या देशभरातील स्टोअरमध्ये हे औषध पुढील सोमवारपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच हे औषध सर्व लोकांना मिळावे यासाठी एक अ‍ॅप लाँच करण्यात येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही घरपोच डिलिव्हरी मिळवू शकता. यात तीन दिवसांमध्ये औषधाची डिलिव्हरी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

असे तयार झाले औषध
पतंजलीने स्पष्ट केले की, कोरोनिलमध्ये गिलोय, अश्वगंधा, तुलसी, श्वासारी रस आणि अणू तेलाचे मिश्रण आहे. हे औषध दिवसातून दोन वेळा घ्यावे लागणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी या औषधाचे दररोज सेवन करावे लागणार आहे. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसचा रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते.

उपचार पद्धती
कोरोनिल औषध तयार करण्यासाठी दोन प्रकारे उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. क्लिनिकल कंट्रोल स्टडी आणि क्लिनिकल कंट्रोल ट्राय या पद्धतीचा वापर केला असल्याचे बाब रामदेव यांनी सांगितलं. क्लिनिकल कंट्रोल स्टडीसाठी दिल्ली, मेरठसह देशातील इतर भागात अनेक रुग्णांवर प्रयोग करण्यात आला. यामध्ये कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. यानंतर क्लिनिकल कंट्रोल ट्रायचा वापर केला. यामध्ये पतंजलनी रिसर्च सेंटर आणि नॅशनल मेडिकल इंस्टिट्युट सायन्स निम्स यांच्या संयुक्त विद्यमाने 100 लोकांवर उपचार करण्यात आले. यात 95 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता.
उपचार करण्यात आलेले रुग्ण हे केवळ 3 दिवसांमध्ये बरे झाले आहेत. जे रुग्ण कोरोनाबाधित होते, त्यांचे रिपोर्ट हे तीन दिवसांनी निगेटिव्ह आले. एवढेच नाही तर सात दिवसांमध्ये रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यात कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. क्लिनिकल कंट्रोल ट्रायलसाटी सीटीआरची परवानगी घेण्यात आली होती. यामध्ये ज्या रुग्णांना कोरोनिल देण्यात आले नव्हते. त्यांच्यामध्ये कोणतेही बदल झाले नाहीत. यामध्ये शंभर टक्के प्रकृती सुधारण्याचा दर असल्याचा दावा रामदेव बाबांनी केला आहे आहे.

280 रुग्णांवर प्रयोग
हर्बल औषधाचे नाव कोरोनिल असणार आहे. हे औषध आयुर्वेदिक साधनांपासून तयार करण्यात आले आहे. या औषधाचे सेवन केल्यानंतर 4 ते 5 दिवसात फरक पाहण्यास मिळणार आहे. पतंजलीच्या रिसर्च सेंटरकडून 280 रुग्णांवर प्रयोग करण्यात आला होता. सात दिवसांमध्ये 100 टक्के रुग्ण बरे झाले. या औषधाचा रिझल्ट 100 टक्के आहे. संपूर्ण नियमांचे पालन करून हे औषध तयार करण्यात आल्याचे रामदेव बाबांनी सांगितले.