साथीच्या आजारांवर पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात – खासदार श्रीरंग बारणे

ADV

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी महापालिका गांभीर्याने पहात नाही. शहारात सर्वत्र अस्वच्छता आहे. पावसाचे पाणी साचुन तयार झालेल्या डबक्यांमध्ये डासांची निर्मिती होत आहे. त्यासाठी महापालिकेने साथीचे आजार रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात अशी मागणी काल दि. ४ ऑक्टोंबर रोजी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्त श्रवण हार्डीकर यांना भेटून केली. त्यांच्या समवेत आमदार गौतम चाबुकस्वार, वैद्यकीय अरोग्य अधिकारी रॉय, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक निलेश बारणे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, महिला संघटीका उर्मीला काळभोर, अनंत कोऱ्हाळे, अनिता तुतारे, सरिता साने उपस्थित होते.

ADV

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5122acbb-c891-11e8-bb64-954d9403731d’]

खासदार बारणे म्हणाले शहरात स्वाईन फल्युने कहर माजविला आहे. स्वाईन फ्ल्युने २८ जणाचे बळी घेतले आहे. स्वाईन फ्ल्यु पाठोपाठ आता डेंग्युने विळखा घातला आहे. मलेरिया, स्वाईन फ्लयु, डेंग्यु, चिकनगुनिया या सारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जानेवारी ते संप्टेंबर या नऊ महिन्यात डेंग्युची लागन झालेले १०३ तर १२६१ संशयीत रूग्ण आढळले आहेत. सध्या रूग्णालयात तुंबुन गर्दी पहायला मिळत आहे. महापालिकेच्या वाय सी.एम. व इतर रूग्णालयात रूग्णांना जागा उपलब्ध होत नाही. खाजगी रूग्णालय देखील तुडुंब भरले आहेत. एकुणच शहरातील नागरिकांची भयभीत स्थिती झाली आहे.

MPSC पास होऊनही नियुक्ती रद्द, विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला

शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असुन महापालिकेचे एक अधिकारी या मध्ये मृत्यूमुखी पडले असतानांही महापालिका ही बाब गार्भीयाने घेत नसुन साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे. स्वच्छते बरोबरच डासाचे व डेग्युचे डास निर्माण होणारे केंद्र नष्ट केली पाहिजेत. शहरामध्ये औषधाच्या फवारणी सर्वत्र करून पावसाचे पाणी साचुन डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे डासांची निर्मिती होत आहेत नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर नाल्याचे पाणी थेट जात असल्याने नदी पात्राला गटारीचे स्वरूप आले असल्याने नदी पात्रातुनही मोठ्या प्रमाणावर डास निर्मिती होत आहे. महापालिकेने औषध फवारनी करावी, औषधाचा साठा मुबलक प्रमाणात ठेवण्यात यावा गरीब रूग्णांसाठी महापालिकेच्या सर्व रूग्णालयात सोय उपलब्ध करून द्यावी.

[amazon_link asins=’B0745CT641,B01MDVMT74′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1ba70095-c892-11e8-9b02-61c2f27cc9e7′]

तसेच खासगी रूग्णालयात पेशंन्टची होत असलेली लुट थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून कमी उत्पन्न गटातील नागरिकांना जागा उपलब्ध करून देवून कमी खर्चात उपचार होण्यासाठी मदत करण्याच्या सुचना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्याचे त्यांनी प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.