Corporator Archana Tushar Patil | प्रभागात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र सुरु करा; भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Corporator Archana Tushar Patil | केंद्र सरकारच्या (Central Government) निर्देशानुसार पुणे मनपा (PMC) हद्दीतील 15 ते 18 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचे (Corona Vaccination) नियोजन केले असून या वयोगटासाठी शहरात 5 स्वतंत्र लसीकरण केंद्राचे नियोजन केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी गुरुवारी (दि.30) दिली. यानंतर आज भाजप (BJP) नगरसेविका अर्चना तुषार पाटील (Corporator Archana Tushar Patil) यांनी पुणे महानगर पालिका आयुक्तांना (PMC Commissioner) निवेदन देऊन भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे.

 

नगरसेविका अर्चना पाटील (Corporator Archana Tushar Patil) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग 19 मध्ये पाच शाळा असून याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तसेच प्रभागामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींची संख्या देखील जास्त आहे. तसेच भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत (Bhavani Peth Regional Office) शाळा न शिकणाऱ्या मुला-मुलींची संख्या देखील मोठी आहे. याशिवाय कार्यालयात वेगवेगळ्या कामासाठी दैनंदिन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. ही परिस्थिती पाहता. प्रभाग 19 मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्र, काशेवाडी (Lokshahir Annabhau Sathe Virangula Kendra, Kashewadi) येथे 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण केंद्र (Vaccination Center) सुरु केले तर जास्तीत जास्त जणांना याचा फायदा होईल.

प्रभाग 19 मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्र, काशेवाडी येथे 18 च्या वरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र असून
याच ठिकाणी 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण केंद्र सुरु करावे,
अशी मागणी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली आहे.

 

 

Web Title :- Corporator Archana Tushar Patil | Start a vaccination center for children between the ages of 15 and 18 in the ward; Demand of BJP corporator Archana Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | हॉटेल मॅनेजरसह इतर 15 जणांकडून ग्राहकांना मारहाण, पुण्याच्या कोथरूड परिसरातील हॉटेल स्पाईस गार्डनमधील घटना

 

Gold Silver Price Today | खूशखबर ! वर्षाच्या अखेरीस सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

 

Pune Crime | पुण्यात तडीपार गुंडाचा हैदोस ! कोयत्याने वार करुन तरुणाच्या खूनाचा प्रयत्न, येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील घटना