Advt.

Pune Crime | पुण्यात तडीपार गुंडाचा हैदोस ! कोयत्याने वार करुन तरुणाच्या खूनाचा प्रयत्न, येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तडीपार केले असताना राजरोजपणे घरी राहून शेजारी राहणार्‍यांना शिवीगाळ करुन त्यांच्या वर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तडीपार गुंड व त्याच्या भावावर येरवडा पोलिसांनी (Yerwada Police Station) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

तडीपार गुंड सचिन अडगळे (वय ३२) आणि त्याचा भाऊ नवनाथ अडागळे (वय ३५, रा. लक्ष्मीनगर येरवडा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे (Pune Criminals) आहेत. याप्रकरणी अब्दुलशकुर शौकत उस्ताद (वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्ताद व अडागळे हे शेजारी शेजारी रहातात. सचिन अडागळे याला पोलिसांनी तडीपार केले असतानाही तो राजरोजपणे घरात रहात होता. २९ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सचिन अडागळे याने फिर्यादी यांच्या घरातील लोकांना विनाकारण शिवीगाळ केली. त्याबाबत फिर्यादी यांनी आरोपीकडे चौकशी केली असता सचिन याने घरातून कोयता आणून फिर्यादीच्या उजव्या हातावर, कानावर, डोक्यावर सपासप वार करुन जबर जखमी केले.

त्याचा भाऊ नवनाथ अडागळे याने फिर्यादीचा भाऊ नियामत व आई यांना काठीने मारहाण (Pune Crime) केली. त्यामुळे ते सर्व जण भितीने दरवाजा बंद करुन घरात लपून बसले. तेव्हा या दोघा भावांनी वस्तीमध्ये हातात कोयता व काठी घेऊन आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली.
त्यांच्या दहशतीमुळे वस्तीतील कोणीही त्यांच्या लोकांना वाचविण्याकरीता पुढे आले नाही.
येरवडा पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Attempted murder of a youth by stabbing with a scythe,
incident at Laxminagar in Yerwada of pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात नागरिकांना त्रास देणार्‍या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

Government Scheme | ‘ही’ सरकारी योजना माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी देते 50,000 ची रक्कम; जाणून घ्या कसा मिळेल लाभ

Employees Pension Scheme | 300% पर्यंत वाढू शकते पेन्शन ! 7500 रुपयांवरून वाढून 25000 रुपये होईल पेन्शन, जाणून घ्या गणित

Multibagger Penny stock | 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 68 लाख, टाटा ग्रुपची आहे कंपनी

Gram Ujala Scheme | 12 वॅट LED बल्ब अवघ्या 10 रुपयात! जाणून घ्या पूर्ण योजना आणि लाभ घेण्याची शेवटची तारीख