Corporator Avinash Bagwe | पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द; कोर्टाकडून ‘त्या’साठी 6 आठवड्यांची मुदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनधिकृत बांधकाम प्रकरणी काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवे (Corporator Avinash Bagwe) यांचे नगरसेवकपद मुंबई उच्च न्यायालयानेही (Bombay High Court) रद्द ठरविले आहे. बागवे यांना सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अपिल करण्यासाठी 6 आठवड्यांची मुदतही न्यायालयाने दिली आहे. (Corporator Avinash Bagwe)

महापालिकेच्या 2017 च्या निवडणूकीत प्रभाग क्र. 19 (अ) लोहियानगर (Lohiyanagar) अविनाश बागवे निवडून आले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती असल्याचा दावा त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अ‍ॅड. भुपेंद्र शेडगे (Adv Bhupendra shedge) यांनी केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्यांची हरकत फेटाळली होती. त्या निर्णयाविरोधात शेडगे यांनी लघुवाद न्यायालयात दावा केला होता. त्यात बागवे यांनी बेकायदा बांधकामाची माहिती लपविली असल्याचे स्पष्ट करीत त्यासंबधीचे पुरावे सादर केले होते. त्यावर न्यायालयाने बागवे यांचे नगरसेवक पद रद्द ठरविले होते. त्याविरोधात बागवे यांनी उच्च न्यायालयात अपिल केले होते. मात्र उच्च न्यायालयानेही (Mumbai High Court) बागवे यांचे पद ठरविले आहे.

 

अविनाश बागवे म्हणाले…

उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदर करतो. न्यायालयाने पुढील 6 आठवड्यासाठी स्थगिती दिली आहे. तसेच हे नगरसेवकपद जरी फक्त उर्वरित काळासाठी रद्द केले असेल तरी या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. आम्हाला विश्वास आहे आम्हाला तिथे न्याय मिळेल.

नगरसेवक अविनाश बागवे (Corporator Avinash Bagwe)

 

Web Title :- Corporator Avinash Bagwe | Congress corporator avinash ramesh bagwe corporator post canceled mumbai high court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | होय ! आम्ही हिंदुत्त्ववादी, सावरकरवादी आहोत, फडणवीसांचा शिवसेनेवर टीकेचा ‘बाण’ (व्हिडिओ)

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 915 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anti Corruption Bureau Pune | 1 लाखाची लाच मागणाऱ्या लाचखोर महिला उपनिरीक्षकला (PSI) पोलीस कोठडी; जाणून घ्या कोर्टामध्ये काय झालं

Gold Price Today | खुशखबर ! लग्नसराईत सोनं झालं ‘स्वस्त’ आणि चांदीही ‘घसरली’, जाणून घ्या Gold चे दर घसरण्याचे कारण

Anti Corruption Bureau Pune | 15 हजाराची लाच घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील 2 लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! YouTube वरील व्हिडिओ पाहून 3 वर्षीय चिमुकलीवर भावाकडूनच लैंगिक अत्याचार