Devendra Fadnavis | होय ! आम्ही हिंदुत्त्ववादी, सावरकरवादी आहोत, फडणवीसांचा शिवसेनेवर टीकेचा ‘बाण’ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेवर (Pune Corporation) भाजपचा (BJP) भगवा आणि आर.पी.आयचा (RPI) निळे झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. मला आता भगवा फडकणार असं आवर्जून सांगायला लागतंय. कारण भगव्याची शपथ घेतलेल्यांना त्याची लाज वाटतेय. अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीकेचा बाण सोडला. पुणे शहर भाजपच्या शिवाजी नगर भागात नवीन पक्ष कार्यालयाचे शुक्रवारी देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपकडून पुणे महापालिकेसमोर मोठा कार्यक्रम घेण्यात आला. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकांचं एका अर्थाने रणशिंग फुंकले गेले. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांकडून आणि इच्छूक उमेदवारांकडून या कार्यक्रमाच्या ठिकाणी समर्थकांसह मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

 

 

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) जोरदार टीका केली. ते म्हणाले, हे आमचे शक्तीप्रदर्शन नाही. आम्ही शक्तिप्रदर्शन करायचे ठरवले तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. ही गर्दी पाहून मला खात्री पटली की पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा आणि आर.पी.आयचा निळा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही.

होय आम्ही सावरकरवादी आहोत

परवा संसदेत दंगा करणाऱ्या 12 खासदारांना निलंबित (12 MP suspended) केले.
त्यामध्ये शिवसेनेचे दोन खासदार होते. संसदेची माफी मागणार का असं या खासदारांना विचारले असता ते म्हणाले माफी मागायला आम्ही काय सावरकर आहोत का?
अरे निर्लज्जांनो ज्या सावरकरांनी (Veer Savarkar) आंदमानात कोलुचा बैल बनून शिक्षा भोगली त्यांच्याबद्दल असे बोलता.
भ्रष्टाचाराने कमावलेल्या पैशातून बांधलेल्या महालात राहणाऱ्यांनी सावरकरांवर चिखलफेक केली आणि तुम्ही त्यात सहभागी होता.
होय आम्ही हिंदुत्त्ववादी आहोत, होय आम्ही सावरकरवादी आहोत, असे फडणवीस यांनी म्हटले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadanvis slam shiv sena ncp and congress in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 915 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anti Corruption Bureau Pune | 1 लाखाची लाच मागणाऱ्या लाचखोर महिला उपनिरीक्षकला (PSI) पोलीस कोठडी; जाणून घ्या कोर्टामध्ये काय झालं

Gold Price Today | खुशखबर ! लग्नसराईत सोनं झालं ‘स्वस्त’ आणि चांदीही ‘घसरली’, जाणून घ्या Gold चे दर घसरण्याचे कारण