खळबळजनक ! नको ‘त्या’ अवस्थेत आढळलं जोडपं, पंचायतीने कापले केस, पाजलं मुत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये एका महिलेला आणि पुरुषाला आपत्तीजनक स्थितीत पकडल्यानंतर तेथील पंचायतीने तुघलकी फर्मान सुनावले आहे. दोघांना पकडल्यानंतर त्यांचे केस कापण्यात आले तसेच सर्वांच्या समोर लघवी पिण्यासाठी देखील त्याला बळजबरी करण्यात आले. सदर घटनेचा व्हिडीओ बनवण्यात आला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील हि घटना घडली आहे.

कालबेलिया समाजातील एका महिला आणि पुरुषाचा सदरचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये या महिला आणि पुरुषाला अतिशय वाईट वागणूक देण्यात येत आहे. या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांचे केस कापून तोंड देखील काळे करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर पुरुषाला बळजबरी लघवी देखील पाजण्यात आली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर येथील पोलीस अधीक्षक डॉ. विकास पाठक व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी जात घटनेचे गांभीर्य समजत तपासाला सुरुवात केली आहे. प्रेमप्रकरणावरून या दोघांना गावकऱ्यांनी आपत्तीजनक अवस्थेत पकडले होते.

त्यानंतर पंचायतीने त्यांना हि तुघलकी शिक्षा सुनावण्यात आली होती. महिलेला देखील मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली आहे. तसेच कोणत्या युवकाच्या मोबाईलवरून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अनेक व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे.  तसेच कोणत्या युवकाच्या मोबाईलवरून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे, याचीदेखील चौकशी  करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like