‘प्री-वेडिंग’ फोटोशूटमध्ये जोडप्यानं केला CAA – NRC चा विरोध, फोटो व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका कपलने प्री वेडिंग फोटोशूट दरम्यान CAA आणि NRC चा विरोध केला आहे. केरळ मधील तिरुवनंतपुरम येथे राहणाऱ्या अरुण गोपी आणि आशा शेखर ने नुकतेच आपले प्री वेडिंग फोटोशूट केले आहे. याबाबतचे फोटोज देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
प्री-वेडिंग फोटोशूट में कपल ने किया CAA-NRC का विरोध, तस्वीरें वायरल
आशा आणि अरुण यांचा विवाह 31 जानेवारी 2020 रोजी संपन्न होणार आहे. दोघांनीही आपल्या प्री वेडिंग शूटच्या दरम्यान काही फोटो काढले होते आणि यातून सीएए आणि एनआरसी बाबत आपला विरोध दर्शवला आहे. यावेळी दोघांनीही आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘आम्ही सोबत आहोत,देशानेदेखील एकसाथ रहायला हवे’ असे कॅप्शन लिहिले आहे.

प्री-वेडिंग फोटोशूट में कपल ने किया CAA-NRC का विरोध, तस्वीरें वायरल
देशभरातून मोठ्या प्रमाणावर CAA आणि NRC ला विरोध होत लोक रस्त्यावर उतरत आहेत. या कपलने देखील आपल्या फोटोजच्या माध्यमातून विरोध दर्शवला आहे. फोटोमध्ये त्यांनी हातात घेतलेल्या फलकावर ‘NO CAA’ आणि ‘NO NRC’ असे लिहिलेले दिसत आहे.

नागरिकता सुधारणा विधेयक CAA चा फुल फॉर्म Citizenship Amendment Act असा आहे.

धार्मिक गोंधळामुळे पाकिस्तान, अफगानिस्तान, बांग्लादेशातून पळून भारतात आलेल्या हिंदू, ईसाई, शीख, पारसी, जैन आणि बौद्ध धर्माच्या लोकांना CAA भारताची नागरिकांत देते. NRC म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजनशिप एक असे रजिस्टर आहे ज्यामध्ये सर्व भारतीय नागरिकांची नोंद असणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/