Coronavirus : 25 दिवस समुद्र यात्रेवर असलेल्या जोडप्यानं केली ‘मज्जा’, किनार्‍यावर पोहचले तेव्हा समजलं ‘कोरोना’ फोफावलाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढत होते, तेव्हा हे जोडपे समुद्रात प्रवास करत होते. प्रवास संपल्यावर ते एका किनाऱ्यावर थांबले तेव्हा त्यांना कळले की संपूर्ण जगात कोरोना विषाणू पसरला आहे.

ब्रिटनमधील मँचेस्टरच्या रयान ओसबोर्नला आपली पत्नी एलेना मनीगेट्टीसह जगभर प्रवास करायचा होता. यासाठी रयानने प्रथम पैसे जमा केले. मग नोकरी सोडली. यानंतर बोट विकत घेतली. मोठी सागर यात्रा करण्याचा हेतू होता.

रयानने त्यांची यात्रा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कॅनरी बेटावरुन सुरू केली. कॅनरी बेट अटलांटिक महासागरामध्ये वायव्य आफ्रिकेच्या सीमेवर वसलेले आहे. येथे रयान आणि एलेना यांनी प्रवासाला सुरुवात केली. त्यांना ब्राझीलच्या उत्तर भागात वसलेल्या सेंट व्हिन्सेंट बेटावर जायचे होते. एका वृत्तसंस्थेनुसार ही माहिती मिळाली.

रयान आणि एलेना यांनी घरात सांगितले की सुट्टीवर असताना कोणतीही वाईट बातमी सांगू नका. म्हणूनच त्यांना कोरोनाबद्दल कुणीही माहिती दिली नाही. २५ दिवसांनंतर जेव्हा ते सेंट व्हिन्सेंट बेटावर पोहोचले तेव्हा जगाच्या परिस्थितीबद्दल जाणून त्यांना आश्चर्य वाटले.

दोघांना कोरोनाची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा ते सेंट व्हिन्सेंट बेटावर पोहोचले, जिथे या कॅरेबियन बेटाच्या सीमा सील केल्या गेल्या होत्या. हजारो क्रूझ जहाज प्रवाश्यांनाही समुद्रातच सोडण्यात आले, जेणेकरुन ते संक्रमित असतील तर हे संक्रमण पृथ्वीवर आणखी पसरणार नाही.

एलेना आणि रयानने सांगितले की फेब्रुवारीमध्ये आम्ही ऐकले होते कि चीनमध्ये एक विषाणू होता, पण २५ दिवसानंतर आम्हाला कॅरेबियन बेटावरून संपूर्ण माहिती मिळाली. आम्हाला कळले की कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने जगावर त्याचे फार वाईट परिणाम होत आहेत.

रयान म्हणाला की जेव्हा आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा असे समजले की व्हायरस अद्याप संपलेला नाही. कॅरेबियन बेटावर पोहोचण्यात अपयशी ठरल्यानंतर दोघांनी बोट ग्रेनाडाकडे वळवली.

दोघांनाही सेंट व्हिन्सेंटला जाण्याची परवानगी मिळत नव्हती. जेव्हा रयानने सांगितले की आम्ही २५ दिवसांपासून समुद्रात आहोत. मग त्यांनी त्यांची जीपीएस हिस्ट्री दाखवली, त्यानंतर त्यांना सेंट व्हिन्सेंटमध्ये येण्याची परवानगी मिळाली.