कर्मचार्‍यांना अखेर सुट्टी घेण्यासाठी का सांगताहेत कंपन्या ? जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : कोविड-19 महामारी पाहता अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांसाठी सुट्टीच्या पॉलिसीत बदल करत आहेत. कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांच्या लीव इनकॅशमेंटला कॅप करत म्हणत आहेत की, त्यांनी काही दिवस सुट्टी घ्यावी. कारण, सध्याच्या संकटात कर्मचारी घरून काम करत आहेत, ज्यामुळे ते सुट्टी सुद्धा कमी घेत आहेत. कर्मचार्‍यांच्या समोर आपल्या सुट्ट्यांबाबत दोन समस्या आहेत. एक म्हणजे त्यांना नोकरी जाण्याची भिती वाटत आहे आणि दुसरी म्हणजे प्रवासावर प्रतिबंध असल्याने ते बाहेर जाऊ शकत नाहीत. या कारणामुळे आता कॉर्पोरेट्स आपल्या कर्मचार्‍यांच्या सुट्टीच्या पॉलिसीत बदल करत आहेत.

मिंटने आपल्या रिपोर्टमध्ये एचआर टेक सोल्युशन्स प्रोव्हायडर फर्म पीपल स्ट्राँगच्या संदर्भाने लिहिले आहे की, एप्रिलपासून जूनच्या दरम्यान 40 टक्केपेक्षा सुद्धा कमी कर्मचार्‍यांनी सुट्टीसाठी अ‍ॅप्लाय केले आहे. ही एक मोठी घसरण आहे. राज्य सरकारांच्या जरूरीप्रमाणे शॉप्स अँड इस्टॅबलिशमेंट अ‍ॅक्ट, 1961 अंतर्गत सुट्टी घेणे अनिवार्य आहे. मात्र, लीव इनकॅशमेंटबबात कोणतीही अनिवार्यता नाही.

पीपल स्ट्राँगचे सह-संस्थापक आणि सीईओ यांच्या संदर्भाने मिंटने म्हटले आहे की, एका रात्रीत या पॉलिसीत बदल करता येणार नाहीत. कंपन्या हे रिव्ह्यू करत आहेत की, किती सुट्ट्या इनकॅशमेंटसाठी योग्य असतील. यास 15 ते 20 टक्के पर्यंत कमी करण्याची योजना आहे. यामुळे काम करण्याची प्रॅक्टिस सुद्धा चांगली राहील आणि सध्याच्या संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल.

अन्य एक कन्सल्टिंग फर्मच्या संदर्भाने लिहिले आहे की, काही कंपन्या शिल्लक रजांची संख्या कमी करत आहेत किंवा लीव इनकॅशमेंटची परवानगी नाकारत आहेत. या वर्षीसाठी तर काही कंपन्या लीव इनकॅशमेंटवर कॅपिंगसुद्धा लावत आहेत. टेक सेक्टरच्या कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करत आहेत की, त्यांनी आपल्या सुट्ट्या घ्याव्यात आणि वर्षाच्या अखेरसाठी त्या वाचवून ठेऊ नये.

एक जाणकाराने म्हटले की, कंपन्यांकडून अशी पावले आपला कॅश फ्लो मेंटेन करण्यासाठी, लीप इनकॅशमेंटवर कॅपिंग लावत आहेत. जर या सुट्ट्या वापरल्या गेल्या नाहीत तर कंपन्यांना वर्षाच्या अखेरीस किंवा राजीनाम्याच्या वेळी कर्मचार्‍यांना पैसे द्यावे लागतील.