COVID-19 in India | गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 94 हजार नवे पॉझिटिव्ह, एका दिवसात सर्वात जास्त मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा वेग मंदावताना दिसत आहे. सर्व राज्यातील रूग्णांची संख्या वेगाने कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, देशात मागील 24 तासात कोरोनाची 94 हजार 52 प्रकरणे समोर आली, तर 6148 रूग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे. कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर आता देशात एकुण संक्रमितांची संख्या 2 करोड 91 लाख 83 हजार 121 झाली आहे. बिहार सरकारने मृतांच्या आकड्यात मोठा बदल केला आहे, ज्यामुळे कोरोना रूग्णांचा मृत्यूचा आकडा वाढला आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत कोरोनाने 11 लाख 67 हजार 952 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत, तर 2 कोटी 76 लाख 55 हजार 493 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाने 3 लाख 59 हजार 676 लोकांचा मृत्यू Death झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनातून मोठा दिलासा मिळत आहे.

 

कोरोनाची राज्यांमध्ये काय आहे स्थिती

महाराष्ट्रात 10,989 नवी प्रकरणे
महाराष्ट्रात बुधवारी कोविड-19 ची 10,989 नवी प्रकरणे समोर आली तर 261 रूग्णांचा मृत्यू झाला. मागील 24 तासात 16,379 रूग्ण बरे झाले. आरोग्य विभागानुसार, नव्या प्रकरणांसह संक्रमितांची एकुण संख्या वाढून 58,63,880 आणि मृतांची संख्या 1,01,833 झाली आहे. महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून नवीन प्रकरणांची संख्या 10 हजारच्या जवळपास राहिली आहे. यापूर्वी 9 मार्चरोजी महाराष्ट्रात कोविड-19 ची 9927 नवीन प्रकरणे समोर आली होती.

* पश्चिम बंगाल
नवीन प्रकरण 5384
मृत्यू 95

* गुजरात
नवीन रूग्ण 644
मृत्यू 10

बिहारने मृतांच्या आकड्यात केली मोठी दुरूस्ती, 3951 मृत वाढवले
बिहारमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाने मरणार्‍यांच्या संख्येत राज्याच्या आरोग्य विभागाने मोठी दुरूस्ती केली, ज्यामुळे महामारीने मरणार्‍यांची एकुण संख्या वाढून 9429 झाली आहे जी बुधवारी 5478 होती. दुरूस्तीनंतर 3951 अन्य मृत्यूंचा समावेश करण्यात आला. मात्र हे मृत्यू Death कधी झाले हे सांगितलेले नाही.

हे देखील वाचा

Coronavirus : मुलांच्या उपचाराची गाईडलाईन जारी, होणार नाही रेमडिसिविरचा वापर

CoWin Vaccination Update : व्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये काही चूक असेल तर घरबसल्या करा सुधारणा, ‘ही’ आहे पद्धत

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 16,379 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.45% 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Wab Title : covid 19 in india india witnessed 94052 new corona case and 6148 death in past 24 hour