Coronavirus : अमेरिकेत ‘कोरोना’चा ‘कहर’ सुरूच, मृतांचा आकडा 97000 च्या वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अमेरिकेत कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे, कोविड-19 मुळे अमेरिकेत आतापर्यंत 97 हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे गेल्या 24 तासांत आणखी 638 मृत्यू झाले आहेत. यामुळे मृतांचा आकडा 97,686 वर पोहोचला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत अमेरिकेने स्पेन आणि इटलीला देखील मागे टाकले आहे.

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या एका वक्तव्याने सर्वांना चकित केले होते ज्यात ते म्हणाले होते की अमेरिकेत जगातील सर्वात जास्त कोरोना विषाणूची लागण होणे हे सन्मानजनक आहे, कारण त्यातून हे समोर येते की कोरोना विषाणूसंदर्भात केली जाणारी तपासणी ही इतरांपेक्षा प्रभावी आहे, मी याकडे एक सन्मान म्हणून पाहतो. खरं तर, आपल्या वक्तव्यावरून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे सिद्ध करायचे होते की कोरोनाविरूद्धच्या युद्धात मोठी कारवाई करत चाचणी करण्याची प्रक्रिया अमेरिकेने मोठ्या पातळीवर नेली आहे.

जगभरात 54 लाखाहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात
त्याच वेळी वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात सध्या 54 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या साथीमुळे कोरोना पॉझिटिव्हची संख्या 5,082,661 वर पोहोचली आहे आणि 344,760 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या प्राणघातक कोरोना विषाणूमुळे बर्‍याच लोकांना दोन वेळचे जेवण देखील भेटणे अवघड झाले आहे कारण कोरोनामुळे भारतासह जगातील बर्‍याच देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे, ज्यामुळे लोकांपुढे भाकरीचे प्रश्न उभे राहिले आहेत.

 

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला केले लक्ष्य
या दरम्यान कोरोना विषाणू संकटाच्या काळात अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला सातत्याने लक्ष्य करीत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत डब्ल्यूएचओच्या क्षमता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असते. काही दिवसांपूर्वी त्यांनी डब्ल्यूएचओला अमेरिकेकडून मिळणारा निधी थांबवण्याबाबतचे वक्तव्य केले होते, परंतु आता त्यांनी डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गॅब्रिसस यांना एक पत्र लिहून चेतावणी दिली आहे की डब्ल्यूएचओने 30 दिवसांत ठोस सुधारणा केल्या नाहीत तर अमेरिकेद्वारा डब्ल्यूएचओला दिला जाणारा निधी कायमचा बंद केला जाईल. सध्या अमेरिकेने निधीस तात्पुरते स्थगित करून ठेवले आहे. ट्रम्प म्हणाले की 30 दिवसांत कोणतीही सुधारणा न झाल्यास डब्ल्यूएचओमध्ये अमेरिकेच्या सदस्यत्वावरही विचार केला जाईल.