कोल्हापूरात टेस्टसाठी तो हॉस्पिटलच्या आवारात झोपला, पुन्हा उठलाच नाही

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना टेस्टसाठी तरुण हॉस्पिटलच्या आवारात झोपला होता. मात्र, तो पुन्हा उठलाच नसल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली असता तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

मुंबई विलेपार्ले इथे राहणारा तरुण कोल्हापूरमध्ये परतला होता. रविवारी स्वॅब टेस्ट देण्यासाठी तो हॉस्पिटलच्या रांगेच उभा होता मात्र वेळ झाल्याने हॉस्पिटल आवारातच झोपला. तिथेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्ह्या आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.

लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर विविध ठिकाणावरील नागरिक मूळगावी परतत आहेत. अशातच मुंबईतून तरुण कोल्हापूरला परतला होता. मात्रा, त्याला खोकला, सर्दी, ताप, दमाचा त्राास होत होता. त्यामुळे तरुण सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता. त्याच्यापुढे मोठी रांग असल्यामुळे तो रूग्णालय आवारात झोपी गेला. मात्रा, बराच वेळ झोपल्यानंतरही तो उठला नाही. त्यामुळे हॉस्पिटल कर्मचार्‍यांनी त्याला उठविण्याचा पृयत्न केला. मात्रा, त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली असली तरीही कोरोना वेगाने वाढत आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाखांवर पोहचली आहे.