IPL Playoff Race झाली ‘रोचक’, 3 दिवस आणि 4 मॅच ठरवणार 6 टीमचे भविष्य, जाणून घ्या कोण किती पुढे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल 2020 मोठ्या प्रतिक्षेनंतर सुरू झाली असली तरी रोचकताही भरपूर निर्माण झाली आहे. टूर्नामेंटमध्ये आतपर्यंत 60 पैकी 52 मॅच झाल्या आहेत प्लेऑफची रेस तरही पूर्णपणे खुली आहे. टूर्नामेंट 44 दिवसांपूर्वी 19 सप्टेंबरला सुरू झाली होती. मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. चेन्नई सुपरकिंग्ज या रेसच्या बाहेर गेली आहे. आता 6 टीममध्ये 3 स्थानांसाठी लढत आहे. पुढील 4 मॅच या 6 टीमचे भविष्य ठरवतील.

आयपीएलमध्ये 56 लीग मॅच असतात. यापैकी आता 4 मॅच बाकी आहेत. शनिवारी अगोदर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स आणि नंतर सनरायजर्स हैद्राबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला हरवले. आता सर्व टीम 13-13 मॅच खेळल्या आहेत. मुंबई इंडियन्स (18) पॉईंट टेबलमध्ये पहिल्या नंबरवर आहे. बेंगळुरू आणि दिल्लीचे 14-14 गुण आहेत. यानंतर हैद्राबाद, राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईटरायडर्स एकसारखे 12-12 गुण आहेत. चेन्नई सुपरकिंग्ज 10 गुणांसह शेवटच्या नंबरवर आहे.

आता प्लेऑफच्या 3 जागांसाठी बेंगळुरू, दिल्ली, हैद्राबाद, राजस्थान, पंजाब आणि कोलकातामध्ये लढत होईल. या लढतीत बेंगळुरू आणि दिल्ली थोडे पुढे वाटत आहेत, परंतु हे निर्णायक अंतर नाही. पुढील 4 मॅचमध्ये काहीही होऊ शकते आणि कोणतेही समीकरण योग्य ठरू शकते.

मॅच 53 : पंजाबसाठी जिंकू किंवा मरू ची लढत
किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी ही जिंकू किंवा मरू अशी लढत आहे. त्यांना प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जला हरवावे लागेल. पंजाबचा पराभव झाला तर प्लेऑफच्या रेसच्या बाहेर जाईल. मात्र, विजयात सुद्धा प्लेऑफची गॅरंटी नाही. जिंकल्यानंतर सुद्धा ते नेट रनरेटमध्ये गडबडू शकतात.

मॅच 54 : कोलकाता विरूद्ध राजस्थान, ज्याचा पराभव तो बाहेर
कोलकाता नाईटरायडर्स विरूद्ध राजस्थान रॉयल्सची ही लढत दोघांसाठी जिंकू किंवा मरू सारखी आहे. जी टीम जिंकेल ती 14 गुण घेऊन प्लेऑफच्या रेसमध्ये कायम राहील. मात्र, जर पंजाबच्या टीमने चेन्नईला हरवले तर मग नेट रनरेटच ठरवेल की, कोणकोणत्या टीम प्लेऑफ खेळतील. कोलकाता आणि राजस्थान सामन्यात पराभव होणारी टीम प्लेऑफच्या रेसच्या बाहेर होईल.

मॅच 55 : दिल्ली विरूद्ध बेंगळुरू, विजेता टॉप-2 मध्ये असेल
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू दोघांची ही 14 वी मॅच असेल. म्हणजे दोघांची शेवटची लीग मॅच. या दोन्ही टीम आपल्या 13व्या मॅच हरल्या आहेत. दिल्ली-बेंगळुरू लढतीत जी टीम जिंकेल, ती पॉईंट टेबलमध्ये दुसर्‍या नंबरवर जाईल. पराभूत टीम रनरेटमध्ये गडबडेल. हे सुद्धा शक्य आहे की, रनरेटमध्ये गडबडून ती प्लेऑफची रेस आणि टूर्नामेंटमधून बाहेर होऊ शकते.

मॅच 56 : हैद्राबादचे भविष्य हिच मॅच ठरवेल
मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैद्राबादचा सामना आईपीएल 2020 चा शेवटची लीग मॅच असेल. मुंबईसाठी ही औपचारिक मॅच आहे. हैद्राबादसाठी ही मॅच खुप महत्वाची आहे. जर ते जिंकले तर त्यांचे 14 गुण होतील. हे निश्चित आहे की, आयपीएलची तिसरी आणि चौथी टीम 14 गुणांसह प्लेऑफ खेळेल. अशावेळी नेट रनरेट ठरवेल की, ती कोणती टीम आहे. म्हणजे, हैद्राबादला केवळ जिंकायचे नाही, तर मोठ्या अंतराने जिंकावे लागेल, तेव्हाच त्यांचे प्लेऑफमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल.