ICC World Cup 2019 : अफगानिस्‍तानचा पाकिस्तानला मदतीचा हात, दिली ‘ही’ ऑफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. वर्ल्ड कप २०१९ मधील गुणतालिकेत १० पॉईंट्ससहऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे.

त्यानंतर नऊ – आठ पॉईंट्स मिळवत न्यूझीलंड आणि इंग्लंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर आता सरफराज अहमद याच्यावर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बैठक पार पडली.

या बैठकीत पीसीबीचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वर्ल्डकप स्पर्धा पार पडल्यानंतर सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार असून काही खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर देखील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

पाकिस्तानला या स्पर्धेत आतापर्यंत या स्पर्धेत फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला असून त्यांनी यजमान इंग्लंडचा पराभव केला आहे. सोशल मीडिया तसेच सर्वच स्तरातून पाकिस्तन संघावर टीका होत असताना आता अफगाणिस्तानने देखील पाकिस्तानवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (एसीबी) ने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या वाईट खेळीवर टोला लगावला आहे. बोर्डाचे संचालक असदुल्लाह खान यांनी पाकिस्तानवर टीका करताना म्हटले कि, “पाकिस्तान संघाला मदत हवी असेल तर आम्ही तयार आहोत”तसेच स्पर्धेच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानपेक्ष उत्तम खेळ केला असून दोन्ही संघ गुणतालिकेत तळाला आहेत.

त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले कि, “यावेळी अफगाणिस्तानचा संघ चांगला आहे. फक्त आम्हाला चांगली कोचिंग, पध्दत आणि सोयी सुविधांची गरज आहे”.त्यामुळेआम्ही त्यांना मदत करू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे वर्ल्डकप आधी झालेल्या सराव सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला होता.

दरम्यान, आज अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार असून भारतीय संघ उत्तम फॉर्ममध्ये असून गुणतालिकेत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

सावधान ! पाय दुखणे हा असू शकतो हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत

महिलांनो, आकस्मिक गर्भपात झाल्यास अशी घ्या काळजी

पांढरे केस काळे करा, मध आणि लसूण आहे रामबाण औषध

हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा