माजी क्रिकेटर इरफान पठाणला संबोधलं आगामी ‘हाफिज सईद’ ! अभिनेत्री ऋचा चड्ढा म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या खतरनाक गोलंदाजीनं बड्या बड्या फलंदाजांना परेशान करणारा माजी भारतीय क्रिकेटर इरफान पठाण त्याच्यावर सोशलवर केल्या गेलेल्या एका कमेंटमुळं निराश आहे. ट्विटरवर एकानं कमेंट केली होती जी इरफान पठाणबद्दल होती. यात लिहलं होतं की, तो आतंकवादी हाफिज सईद बनणार आहे. इरफाननं याचा एक स्क्रीनशॉट ट्विटरवरून शेअर केला होता. इरफानं लिहिलं की, “ही काही लोकांची मानसिकता आहे. आपण कुठे पोहोचलो आहोत ? लज्जास्पद आणि खालच्या पातळीचं.”

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा हिनंही यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं लहिलं की, हे एक फेक अकाऊंट आहे. ही वास्तविक कोणी व्यक्ती नाही.

https://twitter.com/RichaChadha/status/1278631565506027520?s=20

ऋचानं दिलेल्या प्रतिक्रियेनंतर इरफान खाननं याला उत्तर देत लिहिलं की, कोणीतरी हे मॅनेज तर करत आहे ना.

इरफान पठाण विरोधात लज्जास्पद कमेंट

इरफा पठाणनं अलीकडेच ग्रेग चॅपलवर विधान करत म्हटलं होतं की, त्याचं करिअर उध्वस्त करण्यासाठी ग्रेग चॅपलला दोषी ठरवणं योग्य नाही. ही बातमी एका चॅनलनं ट्विटरवर शेअर केली होती. याच बातमीवर एका युजर कमेंट केली की, हाफिज सईद बनण्याच्या आपल्या मनसुब्याला इरफान पठाण लपवू शकत नाहीये.