कोरोना व्हायरसनंतर क्रिकेट सुरू करण्यासाठी ICC नं जारी केली गाईडलाईन, करावी लागतील ‘ही’ कामे

नवी दिल्ली : इन्टरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) ने कोरोना व्हायरसनंतर क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्ण गाईडलाईन जारी केली आहे. आयसीसीच्या या गाईडलाईनमध्ये स्थानिक क्रिकेटर्सपासून इन्टरनॅशनल क्रिकेटर्सचे ट्रेनिंग, खेळ, ट्रॅव्हल आणि व्हायरसपासून सुरक्षेसंबंधी निर्देश जारी केले आहेत. आयसीसीने आपली ही गाईडलाईन 4 भागात विभागली आहे. पहिल्या भागात खेळाडूंना एकट्याने ट्रेनिंग सुरू करायचे आहे. यानंतर दूसर्‍या भागात 3 खेळाडूनंचा ग्रुप ट्रेनिंग सुरू करायचे आहे. तिसर्‍या भागात छोटे ग्रुप किंवा टीम आपल्या कोचसोबत ट्रेनिंग करू शकतील आणि चौथ्या भागात टीम आपल्या सर्व स्क्वाडसह मॅच खेळू शकतील, ज्यामध्ये एकमेकांना स्पर्श करण्यास मनाई असेल.

आयसीसीने सर्व इन्टरनॅशनल टीमला ट्रेनिंगसाठी चीफ मेडिकल ऑफिसर नियुक्त करण्यास सांगितले आहे, ज्याचे काम सरकारच्या नियमांचे पालन करण्याचे असेल. याशिवाय आयसीसीने टीमला मॅच आधी आयसोलेशन ट्रेनिंग देणे आणि कोविड-19 टेस्टबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. याशिवाय आयसीसीने सर्व खेळाडूंची कोविड 19 टेस्ट करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

आयसीसीने सर्व टीमला निर्देश दिले आहेत की, खेळाडूंना कोविड-19 च्या लक्षणांच्या बाबात रिपोट करण्याची प्रक्रिया शिकवावी. तसेच टीमला मेडिकल रूममध्ये बेड लावण्याचे निर्देश दिले आहेत. हे बेड रूग्ण येण्यापूर्वी आणि ठीक झाल्यानंतर पूर्णपणे स्वच्छ झाले पाहिजेत.

आयसीसीने टीमला खेळण्यासाठी सुद्धा भलीमोठी गाईडलाईन जारी केली आहे. यापैकी काही महत्वाचे निर्देश पुढील प्रमाणे –

* मॅच अशा ठिकाणी आयोजित करावी जी सुरक्षित असेल आणि तेथे खेळाडूंचे नुकसान होणार नाही.
* मॅच आयोजनाच्या ठिकाणी कोविड-19 ला तोंड देण्यासाठी सर्व व्यवस्था असावी.
* प्रत्येक ठिकाणी मॅचपूर्वी प्रथम डॉक्टरची नियुक्ती करणे जरूरी आहे. जे खेळाडू आणि मॅच अधिकार्‍यांना वैद्यकीय सेवा देतील.
* मॅचच्या ठिकाणी कोरोना व्हायरस स्पेशलिस्ट हॉस्पिटल असणे आवश्यक आहे, जेणेकरून इमर्जन्सी स्थितीत तेथे ताबडतोब पोहचता येईल.
* क्रिकेटच्या मैदानात आणि बाहेर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.
* सर्व टीमने आपल्या खेळाडूंना बॉलवर थूंकी न लावण्याची सूचना द्यायची आहे.
* मॅचदरम्यान खेळाडू आणि पंचांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे जरूरी आहे.

प्रवासासाठी आयसीसीची गाईडलाईन

* सर्व टीमला आपल्या आणि दुसर्‍या देशातील प्रवासाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल.
* सेल्फ आयसोलेशन, क्वारंटाईनचे नियम पाळणे जरूरी आहे.
* प्रवासात खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष ठेवायचे आहे.
* प्रवासासाठी विशेष विमानाचा वापर करण्याचा प्रयत्न करावा.
* खेळाडूंसाठी हॉटेलचा एक पूर्ण फ्लोर बुक करावा आणि प्रत्येक खेळाडूला एक वेगळी खोली द्यावा.
* हॉटेलच्या पदार्थांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे.
* इन्टरनॅशनल टीम मेडिकल डॉक्टरांसोबतच प्रवास करेल.