ICC चे क्रिकेट चाहत्यांसाठी कोडे, बघूया तुम्ही ‘पास’ होता की ‘नापास’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट चाहत्यांसाठी ही वेळ सोपी नाहीये. जगात क्रिकेट कुठेही खेळले जात नसण्याची ही कदाचित पहिली वेळ आहे. यावेळी आयपीएल पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात अशा वेळी प्रथम श्रेणीचा देखील कोणाताही सामान खेळला जात नाहीये. सहसा लोक घरी बसून क्रिकेटची वाट पाहत असत, अशा वेळी लोकांना जास्त काळ घरात राहण्याची सक्ती केली असून क्रिकेट पाहण्याचा कोणताही पर्याय त्यांच्याकडे नाहीये. अशा परिस्थितीत आयसीसी चाहत्यांना एक प्रकारे क्रिकेटशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

चाहत्यांसाठी शेअर केले कोडे
या प्रयत्नात आयसीसीने ट्विटरवर चाहत्यांसाठी एक मजेदार क्रॉसवर्ड शेअर केले आहे. या क्रॉसवर्डमध्ये १२ प्रकारच्या बॉलची नावे विचारण्यात आली होती. आयसीसीने चाहत्यांना सर्व १२ बॉल ओळखण्यास सांगितले. अनेक चाहत्यांनी त्या ट्विटला प्रत्युत्तर देत बॉलला नावे दिली. तुम्हीही प्रयत्न करा कि कोणत्या १२ बॉलची कोणती नावे अस्तित्त्वात आहेत.

अनेक उत्तरं आल्यानंतर आयसीसीने योग्य उत्तर चाहत्यांसोबत शेअर केले. आता तुम्ही पहा कि तुमची किती उत्तरं बरोबर होती.

आयसीसीने यापूर्वीही चाहत्यांसाठी अशी कोडी आणली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी केएल राहुल मध्ये लपलेला विराट कोहलीचा चेहरा ओळखण्यास सांगितले. भारतासह जगातील जवळपास सर्वच क्रिकेट खेळणार्‍या देशांमध्ये क्रिकेट सामन्यांवर बंदी आहे. २९ मार्चपासून भारतात सुरू होणारी आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. त्यानंतरही आयपीएल होण्याची शक्यता दिसत नाही.