#Video : …म्हणून ऋषभ पंतला ४थ्या क्रमांकावर मैदानात उतरवले, रोहितने दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ICC क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने टीम इंडियाला रोखल्यानंतर रोहित शर्माने प्रेस कॉन्फरन्स घेतली, ज्या त्याने सर्वांची बोलती बंद केली. इंग्लंडकडून भारताला हार मानावी लागल्यानंतर जेव्हा रोहितला विचारले की विराट कोहली बाद झाल्यानंतर ऋषभ पंतला नंबर ४ वर पाठवण्यात आले तेव्हा तुम्हाला काय वाटले. तेव्हा रोहित शर्माने उत्तर दिले की, पंतला नंबर ४ वर उतरल्याचे पाहून मला कोणतेही आश्चर्य वाटले नाही. तुम्हाला सर्वांना वाटत होते की त्याने नंबर ४ वर खेळावे. भारतातून इंग्लंडला येई पर्यंत सर्वजण हेच विचारत होते की, पंत कुठे आहेत, पंत कुठे आहे. तर पंत नंबर ४ वर आहे.

पंतला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात विजय शंकर ऐवजी संधी देण्यात आली होती आणि त्यांने या सामन्यात २९ बॉलमध्ये ३२ रन केले आहे.

म्हणून पंतला ४ थ्या क्रमांकावर मैदानात उतरवण्यात आले
रोहित शर्माने सांगितले पंत सारख्या खेळाडूला मैदानात उतरण्याची संधी मिळायला हवी, तसेही वॅर्ल्ड कपमधील पहिलीच मॅच होती. त्यामुळे त्यांच्या कडून जास्त अपेक्षा ठेवणे योग्य नाही. त्यांना मैदानावर अधिक वेळ मिळावा म्हणून हार्दिकच्या जागी 4 थ्या नंबर वर त्याला मैदानात उतरवण्यात आले.

कोणाला मैदानात उतरावयाचे हे नक्की नव्हते
रोहित शर्माने हे ही स्पष्ट केले की, नंबर 4 वर कोणाला उतरावयाचे यावर निश्चिती झाली नव्हती. पहिल्यांदा स्पष्ट करण्यात आले होते की तेथे विजयशंकर यांना उतरवण्यात येणार होते मात्र दुखापतीमुळे त्यांना इंग्लंड विरोधच्या सामन्यात मैदानात उतरवले नाही.

आरोग्यविषयक बातम्या

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे