‘हिटमॅन’ रोहितच्या टीमनं 754 धावांनी जिंकली ‘मॅच’, सगळे विरोधी फलंदाज भोपळयावर ‘OUT’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रिकेटच्या मैदानावर टीम बर्‍याचदा खराब कामगिरी करून मॅच गमावतात, पण मुंबईत सध्या सुरू असलेल्या हॅरिस शिल्ड स्पर्धेत एका संघाने सर्व मर्यादा ओलांडल्या. बुधवारी झालेल्या सामन्यात चिल्ड्रन वेलफेअर स्कूलची टीम अवघ्या 7 धावांवर बाद झाली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या संघाचा एकही फलंदाज खाते उघडू शकला नाही. संघाचे सर्व फलंदाज शून्यावर बाद झाले.

या सामन्यात चिल्ड्रन वेलफेअर स्कूलची टीम हारली. विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विरोधी संघाने 754 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. चिल्ड्रन वेलफेयर स्कूलच्या फलंदाजांना हारविण्यासाठी फक्त दोन गोलंदाज पुरेसे होते. विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा वेगवान गोलंदाज आलोक पालने तीन ओवरमध्ये तीन धावा देऊन 6 विकेट घेतले व कप्तान वरोद राजने दोन विकेट घेतले.
Related image
विवेकानंद स्कूल संघाने प्रथम फलंदाजी करत 39 ओवरमध्ये 761 धावा केल्या. मीत मायरेने तिहेरी शतक ठोकले. त्याने 134 चेंडूत नाबाद 338 धावा केल्या. या फलंदाजाने 56 चौकार आणि 7 षटकार लगावले. या सामन्यात चिल्ड्रन वेलफेयर स्कूलवर 156 धावांची पेनल्टी ही लावण्यात आली. संघाचे गोलंदाज 3 तासांच्या कालावधीत 45 ओवर गोलंदाजी करू शकले नाहीत.

टीम इंडियाचा उपकप्तान रोहित शर्मा विवेकानंद शाळेत शिकत होता. या शाळेच्या संघाकडून खेळताना त्याने क्रिकेटचे कौशल्य शिकले होते. रोहित शर्मा गरीब कुटुंबातला होता पण एक चांगला क्रिकेटपटू असल्यामुळे या शाळेत त्याला प्रवेश मिळाला. आज रोहित शर्मा त्याच्या खेळातून कौशल्य दाखवत आहे आणि त्याच्या शाळेची क्रिकेट पातळीही वर दिसत आहे. रोहित शर्माला आपल्या शाळेचे हे आश्चर्यकारक वर्णन ऐकल्यास नक्कीच गर्व वाटेल.

Visit : Policenama.com