महिला अँकरच्या ‘त्या’ प्रश्‍नावर सचिन तेंडूलकरने मारला ‘सिक्सर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ३६ धावांनी विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला. त्यानंतर काल झालेला न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसात वाया गेला. त्यामुळे सलग तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत वरच्या स्थानावर जाण्याची भारतीय संघाची संधी हुकली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याकडे लागले आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे आपला संघ जिंकावा यासाठी यासाठी प्रार्थना करत आहे.

याच प्रकारचा प्रश्न भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याला एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत एका महिला अँकरने विचारला असता त्याने त्यावर अशी प्रतिक्रिया दिली कि, त्या उत्तराने महिला अँकरला आपले हसू आवरता आले नाही. या मुलाखतीत महिला अँकरने सचिन तेंडुलकरला भारत आणि पाकिस्तान सामन्याला सुरुवात होण्याआधीच वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे, याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होऊ शकतो का असा प्रश्न विचारला असता सचिन म्हणाला कि, १६ जूनला काय आहे? यावर ती महिला अँकर आपले हसू आवरू शकली नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देताना सचिनने सिक्सर मारला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यावेळी सचिनने २००३ च्या वर्ल्डकपमधील काही आठवणींना उजाळा देत त्यावेळचे किस्से सांगितले.

दरम्यान, त्याचवेळी तो म्हणला की, भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष आता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याकडे असणार आहे. शनिवारनंतर भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा विचार करतील असेही तो म्हणाला. त्याचवेळी या परिस्थितीत त्याने भारतीय संघाला विजेतेपदाची प्रबळ दावेदार म्हटले आहे.

सिनेजगत

वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’

सिंहाच्या तोंडावर ‘केक’ लावल्यामुळे भडकली रविना टंडन

दिशा पाटनीच्या बर्थ डे पार्टीत ‘तशा’ अवतारात आला टायगर श्रॉफ ; फोटो व्हायरल

‘या’ आहेत बॉलिवूडच्या टॉप ‘५’अ‍ॅक्ट्रेस ज्यांना तुम्ही ओळखू शकणार नाहीत

 

 

You might also like