MS धोनी आणि ऋषभ पंत दोघेही ‘T – 20’ वर्ल्ड कप मध्ये नसणार, मग ‘विकेटकिपर’ कोण ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महेंद्र सिंह धोनी आणि ऋषभ पंत हे भारतीय क्रिकेट मधील दोन नावे. एकाने केलेत अनेक रिकॉर्ड तर एक प्रतिभावान. या दोघांच्या विकेटकिपरिंगची तुलना होऊ शकत नाही. परंतू यांच्या शिवाय भारतीय टीम पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी – 20 वर्ल्ड कपमध्ये यश मिळवू शकत नाहीत. परंतू भारतीय संघापुढे अनेक आव्हाने आहेत, असे असले तरी सर्व प्रश्न एकाच बाबतीत आहेत.

प्रश्न – 1
आयसीसी वर्ल्डकप 2019 मध्ये सेमीफायनलमधून भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर महेंद्र सिंह धोनीने भारतीय संघाबरोबर एकही सामना खेळलेला नाही. वेस्ट इंडिजविरोधातील सामन्यात देखील धोनी दूर राहिला, तसेच आता दक्षिण अफ्रिकेच्या सामन्यापासून देखील धोनी लांब आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बांग्लादेश विरोधात देखील धोनी खेळणार नाही. यामुळे पर्याय म्हणून निवडकर्त्यांनी ऋषभ पंतची विकेटकिपर म्हणून निवड केली.

प्रश्न – 2
वर्ल्डकपमधून भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर शक्यता वर्तवल्या जात होत्या की धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेईल. परंतू असे घडले नाही. यानंतर निवडकर्त्यांनी सांगितले की आता मुख्य विकेटकिपर ऋषभ पंत असेल आणि त्याची तयारी करुन घेण्याची जबाबदारी धोनीची असेल. यामुळेच धोनीने अजून टी 20 वर्ल्डकपमध्ये संघाशी जोडलेला आहे. परंतू ऋषभ पंतच्या खेळीमुळे त्याच्यावर टीका होत आहे. परंतू धोनीने अजून  की ऋषभ पंत बरोबर मैदानात वेळ घालवला ना की त्याला कोणत्याही सूचना दिल्या. याशिवाय पंतचे धोनीने एकदाही समर्थन केले नाही.

प्रश्न – 3
धोनी नंतर निवडकर्त्यांची पहिला पसंद असलेल्या पंतने आतापर्यंत 11 कसोटी, 12 वनडे आणि 20 टी 20 सामने खेळले आहेत. परंतू एकानंतर एक येणाऱ्या अपयशामुळे त्याच्यावर टीका होत आहे. वेस्ट इंडिजच्या विरोधात पंतने दोन वनडेमध्ये फक्त 20 धावा केले आहेत. तर तीन सामन्याच्या कसोटीत 58 धावा काढल्या. तर दक्षिण अफ्रिकेच्या विरोधात टी – 20 मध्ये 4 आणि 19 धावा केल्या. आता प्रश्न आहे की, धोनी नंतर भारतीय संघाच्या विकेटकिपरची जबाबदारी संभाळणार कोण?

प्रश्न – 4
एमएसके प्रसाद म्हणाले की, आम्ही ऋषभ पंतच्या वर्कलोडवर लक्ष ठेवून आहेत. आम्ही 3 फॉर्मेटमध्ये पंतची जागा घेणाऱ्या खेळाडूंना तयार करत आहेत. आमच्याकडे केएस भरत आहे जो इंडिया ए मध्ये अनेक काळापासून चांगले प्रदर्शन करत आहे. कमी ओवरसाठीच्या सामन्यासाठी आमच्याकडे इशान किशन आणि संजू सॅमसन आहे. ते म्हणाले की निवड समितीला ऋषभ पंतवर पूर्ण विश्वास आहे आणि तो संघातील विकेटकिपरसाठी पहिली पसंत आहे.

अनेक दिग्गजांना उपस्थित केले प्रश्न 
भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री म्हणाले की ऋषभ पंत सतत खराब प्रदर्शन करत आहे, संघातून त्याला काढले जाऊ शकते. तर विराट म्हणाला की तरुण खेळाडूंना 4 – 5 संधीत स्वत:ला सिद्ध करावे लागेल. नवे नियुक्त कोच विक्रम राठोड यांनी देखील पंतला समज दिली आहे की घाबरणे आणि बेजबाबदार असणे यात फरक आहे. तर गंभीरने देखील प्रतिक्रिया देत सांगितले की पंतच्या जागी संजू सॅमसंग तयार आहे. हे पाहणे योग्य ठरेल की दक्षिण अफ्रिकेच्या विरोधात कसोटी सामन्यात पंत विकेटकिपिंग करतो की साहा ही जबाबदारी स्विकारतो.

पंत 20 टी 20 सामन्यातील 12 मध्ये फ्लॉप 
पंतने आपल्या करिअरमध्ये 20 टी – 20 सामने खेळले. परंतू त्यांने 19 मधील 11 डाव्यात दहाचा आकडा देखील पार केला नाही. येवढेच नाही तर पंत ने मागील 7 डावांमध्ये 5 पेक्षा कमी धावा केल्या आहेत.