ICC World Cup 2019 : रिकी पॉन्टिंग म्हणतो, ‘पाक Vs पाक असा होईल सामना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने विंडीजचा १२५ धावांनी दणदणीत पराभव करत आपला पाचवा विजय साजरा केला. याचबरोबर भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत अपराजित आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत धडपडताना दिसून येत आहे. गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला इतर संघावर अवलंबून राहावे लागणार आहे. कारण इतर संघांच्या जय पराजयावर त्यांचे सेमीफायनलमधील स्थान अवलंबून आहे.

त्याचबरोबर त्यांनी सलग दोन सामन्यांत विजय मिळवून सेमीफायनच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र त्यांना उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. त्यांचे दोन्ही सामने बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध होणार आहेत. तुलनेने सोपे समजले जाणारे हे सामने पाकिस्तानसाठी मात्र डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

याचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने पाकिस्तानविषयी मोठे वक्तव्य केले आहे. पाकिस्तन संघाच्या कामगिरीविषयी बोलताना तो म्हणाला कि, पाकिस्तान जिथं हारणार असं वाटतं तिथं जिंकतो तर जिथं पराभूत करायचं असतं तिथं हारतो. आता पाकिस्तानचा सामना विरोधी संघाबरोबर नाही तर पाक विरुद्ध पाक असाच आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ त्याच्या या वक्तव्यापासून प्रेरणा घेऊन उर्वरित दोन सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पाकिस्तानची या स्पर्धेतील कामगिरी ही १९९२ च्या वर्ल्डकप सारखीच आहे. त्यामुळे या दोन्ही सामन्यांत विजय मिळवला तर पाकिस्तानला या वर्ल्डकपवर नाव कोरण्याची संधी आहे.

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

अशोक चव्हाणांना ८ वर्षांत न जमलेले ‘ते’ काम १ महिन्यात केले : खासदार चिखलीकर

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण