MIM च्या नगरसेवकाने पिस्तूलच्या धाकाने केला बलात्कार ; नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – चाकण येथील कंपनीत काम करणाऱ्या महिलेस आई आजारी असल्याचा बहाणा करुन नेवून, पिस्तूलाचा धाक दाखवून, विनयभंग, गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्या प्रकरणी औरंगाबाद येथील एमआयएमच्या नगरसेवकासह तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात बलात्कार, विनयभंगचा गुन्हा दाखल झाला आहे.

हा प्रकार २६ नोव्हेंबर २०१८ ते २४ फेब्रुवारी २०१९ दरम्यान खंडाळा वॉटर पार्क, कृष्णासागर रेसिडेन्सी बारामती, टाऊन हॉल औरंगाबाद, गिरीजा हॉटेल आणि लॉज, हर्सूल औरंगाबाद येथे घडला आहे.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक मतीन रशीद सैय्यद,  हामेद सिद्धकी आणि मोहसीन रशीद सैय्यद या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

यातील नगरसेवक आणि त्याच्या साथीदारांनी ओळखीचा फायदा घेतला. पीडित महिला चाकण येथे कंपनीत कामाला असताना आई आजारी असल्याचा बहाणा करुन तिला तिच्या मुलासह मोटारीत बसवून नेले. त्यांनतर खंडाळा येथील वॉटर पार्क येथे नेवून पिस्तूलाचा धाक दाखवून विनयभंग केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. हर्सूल येथील एका घरात ठेवून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला आणि जबरदस्तीने कागदावर सह्या घेतल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास चाकण पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like