बारामतीत 9 सावकारांविरोधात गुन्हा दाखल तर सहा जणांना अटक

पोलीसनामा ऑनलाईन – सरकार सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विद्यमान नगरसेवक जयसिंग उर्फ बबलू अशोकराव काटे-देशमुख यांच्यासह अन्य प्रतिष्ठान प्रतिष्ठातांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील व्यापारी प्रीतम शशिकांत शहा यांना सावकारीच्या पैशातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात नऊ सावकारांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
जयशे उर्फ कुणाल चंद्रकांत काळे (रा. भिगवण रोड बारामती), जयसिंग उर्फ बबलू अशोकराव काटे-देशमुख (रा. देशमुख वस्ती, पाटस रोड, बारामती), संजय कोंडीबा काटे (रा. काटेवाडी, तालुका बारामती), विकास नागनाथ धनके (रा. इंदापूर रोड, बारामती), मंगेश ओमासे (रा. सायली हिल, बारामती), प्रवीण दत्तात्रय गालिंदे (रा. खाटीक गल्ली, बारामती), हनुमंत सर्जेराव गवळी (रा. अशोकनगर जैन मंदिराशेजारी, बारामती) संघर्ष गव्हाळे (रा. बारामती), सनी उर्फ सुनील आवाळे (रा. खंडोबानगर बारामती)

महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार भादंवि कलम ३०६ ५०६, ३४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक प्रीतम शहा (रा. सहयोग सोसायटी) बारामती यांनी याबाबत फिर्याद दिली असल्याचे ठाणे अंमलदार रामदास जाधव यांनी सांगितले. यातील जयेश काळे, जयसिंग काटे-देशमुख, संजय काटे, प्रवीण गालिंदे, हनुमंत गवळी व सनी आवाळे यांना अटक करण्यात आली आहे.