अकोला येथील तत्कालीन उपलेखा परिक्षकाविरुध्द ‘अपसंपदेचा’ गुन्हा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ऑडिट विभागाचे उपलेखा परिक्षकाविरुद्ध उपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळून आल्याने अकोला येथील ऑडीट विभागाचे उपलेखा परिक्षक दीपक दत्तात्रय पाटील ( ४९) व त्यांची पत्नी मनिषा (रा. बळीराम पेठ, जळगाव) यांच्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री शहर पोलिसात अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे.

पाटील यांनी त्यांच्या व पत्नीच्या नावे ७ सप्टेबर १९९२ ते ३१ डिसेंबर २००९ या कालावधीत ५६ लाख ४६ हजार ४४ रुपयांची अपसंपदा जमविल्याचे निष्पन्न झाले. पाटील यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. पाटील यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यापूर्वी त्यांच्याविरुध्द तक्रार आली होती. त्यावरुन सुरुवातीला गुप्त व नंतर उघड चौकशी करण्यात आली. त्यांनी आपल्या नोकरीच्या काळात ८३ लाख ८६ हजार १९३ रुपयांचे उत्पन्न संपादित केले आहे. त्याचा खर्च ६८ लाख २० हजार ७५२ रुपये झाला. त्यांनी एकूण ७२ लाख ११ हजार ४८५ रुपयांची मालमत्ता संपादित केली आहे. त्यात त्यांना ५६ लाख ४६ हजार ४४ रुपयांचा (६७ टक्के) उपन्नाचा स्त्रोत सांगता आला नाही. त्यामुळे त्यांनी ही संपत्ती गैरमार्गाचा वापर करुन मिळविली असल्याने चौकशीअंती उपअधीक्षक जी. एम .ठाकूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.