पुणे : कुरीयर कर्मचाऱ्याला लुबाडणाऱ्या टोळीतील दोघांकडून कार, रक्कम जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कुरीयर कंपनीच्या कर्मचाऱ्याला अडवून त्याला कारमध्ये बसवून नेत ५ लाख रुपये लंपास करणाऱ्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट ४ च्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि लुबाडलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.

शाम राजू शिंदे (वय ३१, अरण्येश्वर) व आकाश प्रविण जाधव (वय २४, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापुर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने दीपक राजाराम गायकवाड (वय ३५, रा. नेहरूनगर पिंपरी), बालाजी लक्ष्मण मसूरे (वय ३३, रा. थेरगाव) यांना अटक केली होती.

कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्याला लुबाडल्याप्रकरणी गुन्हे शाखेची विविध पथके तयार करण्यात आली होती. त्यावेळी गुन्हे शाखेच्या युनीट चारचे पथक तपास करत होते. त्यावेळी युनीट चारचे पोलीस कर्मचारी सुनील पवार, सचिन ढवळे, विशाल शिर्के यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, याप्रकरणातील आरोपी शाम शिंदे हा लोणावळा येथे आहे.

तो त्याच्याकडील हुंदाई कारने परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला तेथून अटक केली. तर त्याच्यासोबतचा एक साथीदार आकाश जाधव याचीही माहिती मिळाली. त्याच्याकडे गुह्यातील रक्कम असल्याने त्यालाही विश्रांतवाडी परिसरातून पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख १९ हजार ५०० रुपये, मोबाईल आणि हुंदाई कार असा मुद्देमाल जप्त करण्यात व हुंदाई कार जप्त केली.

काय घडले होते?

परेशकुमार कडीया हे पटेल यांच्या कुरीयर कंपनीत नोकरी करतात. ते व्यवसायातील जमा झालेली रक्कम घेऊन त्यांच्या अक्टीवा दुचाकीवरून जात असताना दोघे कार घेऊन आले. त्यांनी त्यांच्या गाडीला ७ लव्हज चौकात कार आडवी लावून त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील ५ लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून ५ किमी पुढे नेऊन सोडून देत पोबारा केला.

त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक याचा तपास करत होते. त्यावेळी चारचाकीचा क्रमांक घेऊन तपास केल्यावर मुळ मालकाची माहिती काढली. त्यावेळी ही गाडी शाम शिंदे यांच्याकडे गहाण ठेवली असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस कर्मचारी सचिन जाधव यांनी आरोपींची माहिती काढून बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोघांना पोलिसांनी अटक केली.

त्यांनी त्यांचे मित्र शाम शिंदे, आकाश जाधव, निकुंज पटेल, मेहमुद सय्यद, यांच्यासोबत मिळून गुन्हा केल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, कर्मारी सुनील पवार, सचिन ढवळे, विशाल शिर्के, शंकर पाटील, गणेश काळे, अशोक शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोग्य विषयक वृत्त –

मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची

ब्लड ऑन कॉलवर विधानसभेत चर्चा, आरोग्य मंत्र्यांनी दिले उत्तर

Yoga Day 2019 : चार हजार शाळकरी विद्यार्थ्यांनी साजरा केला ‘योगा डे’

Yoga Day 2019 :अमित शहांसोबत मनोहरलाल सरकार करणार योगभ्यास